Maghi Ganesh Jayanti : 1 की 2 फेब्रुवारी? यंदाची माघी गणेश जयंती नेमकी कधी? वाचा पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त
Maghi Ganesh Jayanti 2025 : 2025 वर्षातली माघी गणेश जयंती 1 की 2 फेब्रुवारी रोजी साजरी करावी? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय.

Maghi Ganesh Jayanti 2025 : हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती (Lord Ganesha) साजरी केली जाते. हिंदू धर्ममान्यतेनुसार, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते. म्हणूनच भगवान गणेशाल प्रथम पूजनीय स्थान आहे. माघ महिन्यातील गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून सुद्धा ओळखली जाते.
मात्र, 2025 वर्षातली माघी गणेश जयंती 1 की 2 फेब्रुवारी रोजी साजरी करावी? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
माघी गणेश जयंती 2025 शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, माघी गणेश जयंती शनिवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीच्या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी शुभ मुहूर्ताची वेळ सुरु होणार आहे. तर, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 14 मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहील. या काळात भगवान गणेशाची विधीवत पूजा केली जाते. 1 फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 38 मिनिटांपासून सुरु होणार आहे. तर, दुपारी 01 वाजून 40 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे. गणरायाची पूजा करण्यासाठी 2 तास 2 मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल.
माघी गणेश जयंती 2025 पूजा विधी
- माघी गणेश जयंतीच्या दिवशी सर्वात आधी पहाटे लवकर उठून स्नान करावे. तसेच, शुभ्र स्वच्छ कपडे परिधान करावेत.
- स्नान केल्यानंतर, चौरंगावर स्वच्छ कपडा ठेवावा. तसेच, गणारायाच्या मूर्तीची स्थापना करावी.
- गणपतीला जल, दूध, मध आणि दह्याने अभिषेक करावा.
- त्यानंतर, गणपतीसमोर धूप आणि दिवा लावावा.
- गणरायाला फूल, दुर्वा, सुपारी, फळ आणि मिठाई अर्पण करावी.
- त्यानंतर, गणपतीच्या मंत्राचं पठण करावं. तसेच, आरती करुन प्रसाद द्यावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Mauni Amavasya 2025 : बाकी काही नको, अमावस्येला करा फक्त 'हे' 5 उपाय; पितृदोषापासून कायमची मिळेल मुक्ती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
