एक्स्प्लोर

Madhya Pradesh : गोव्याला जाण्याचा होता प्लॅन; नवरा घेऊन गेला अयोध्येत, नाराज बायकोने मागितला घटस्फोट

Madhya Pradesh : भोपाळमध्ये राहणाऱ्या जोडप्याचं ऑगस्ट 2023 मध्ये लग्न झालं, त्यानंतर त्यांनी हनीमूनला जाण्याचा प्लॅन केला होता.

Madhya Pradesh :  मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून (Bhopal) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळच्या एका महिलेने पतीकडून एका विचित्र कारणासाठी घटस्फोट मागितला आणि ते म्हणजे, तिचा नवरा तिला गोव्याऐवजी अयोध्येला घेऊन गेला. महिलेने कौटुंबिक न्यायालयात पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला आहे. बायकोचा आरोप आहे की, तिच्या नवऱ्याने तिला गोव्याला नेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अखेरच्या क्षणी तो तिला अयोध्येला घेऊन गेला. सध्या पती-पत्नी दोघांचीही समजूत घातली जात आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये झालं होतं दोघांचं लग्न

हे प्रकरण भोपाळच्या पिपलानी भागातील असल्याची माहिती आहे. ऑगस्ट 2023 मध्ये दोघांनी येथे लग्न केलं. या महिलेचा नवरा आयटी प्रोफेशनल असून चांगला पगार कमवतो. लग्नानंतर दोघांना हनिमूनला जायचं होतं. यावेळी बायको म्हणाली, आपण परदेशात कुठेतरी फिरायला जाऊ, पण नवरा म्हणाला, घरी वयोवृद्ध आई-वडील असल्याने आपण देशातच कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊ. जर आपण परदेशात गेलो तर घरी आई-वडिलांकडे बघायला कोणी नसेल.

दरम्यान, दोघांमध्ये झालेल्या बऱ्याच वादानंतर दोघांनी सहमताने गोव्याला जाण्याचं ठरवलं. आता बायकोचा आरोप असा आहे की, प्लॅनिंगनुसार आम्ही गोव्याला जायचं ठरवलं होतं, पण जाण्याच्या एक दिवस आधी नवऱ्याने कार्यक्रम बदलला आणि अयोध्या आणि बनारसला जाण्याची चर्चा सुरू केली. नवऱ्याने सांगितलं की, त्याला आईला अयोध्या राम मंदिरात घेऊन जायचं आहे आणि म्हणून आपण अयोध्या आणि बनारसमध्ये फिरुया.

दोघांमध्ये झाला बराच वाद

आता या सगळ्यानंतर बायको नवऱ्यासोबत अयोध्येला गेली खरी, पण घरी परतल्यावर तिने तांडव घातला. घरी आल्यावर त्या दोघांचा वाद झाला, त्यामुळे बायकोने कंटाळून कोर्टात धाव घेतली आणि घटस्फोटासाठी अर्ज केला. माहिती देताना रिलेशनशिप कौन्सिलर शैल अवस्थी यांनी सांगितलं की, पत्नीने पतीवर विश्वास तोडण्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. पत्नीचा आरोप आहे की, तिचा पती आपला बहुतेक वेळ आपल्या कुटुंबासाठी घालवतो आणि तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तो तिला वेळ देत नाही, फक्त त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना वेळ देतो आणि त्यांचीच काळजी करतो.

हेही वाचा:

VIDEO : पोलिसांच्या गाडीचं पेट्रोल संपलं तर कैद्यांनीच मारला गाडीला धक्का; बिहार पोलिसांच्या करामतीने सर्वच हैराण

Agra : एका मशेरीने मोडला संसार! पत्नी दिवसातून तीनदा मशेरी लावते म्हणून काढलं घराबाहेर

महत्त्वाच्या बातम्या

Astrology: आज 13 ऑगस्टचा दिवस 3 राशींना ताकही फुंकून प्यावं लागणार! चंद्र-केतूची घातक युती, आर्थिक स्थितीवर परिणाम? 'या' गोष्टींची काळजी घ्या..
आज 13 ऑगस्टचा दिवस 3 राशींना ताकही फुंकून प्यावं लागणार! चंद्र-केतूची घातक युती, आर्थिक स्थितीवर परिणाम? 'या' गोष्टींची काळजी घ्या..
Horoscope Today 13 August 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सावधानतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सावधानतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Shravan 2026: प्रतिक्षा संपली, श्रावण मास सुरू! आज पहिलाच श्रावणी गुरूवार विशेष, 5 राशींचं भाग्य फळफळलं, बुधादित्य राजयोगासह अनेक योग जुळले, महत्त्व, भाग्यशाली राशी...
प्रतिक्षा संपली, श्रावण मास सुरू! आज पहिलाच श्रावणी गुरूवार विशेष, 5 राशींचं भाग्य फळफळलं, बुधादित्य राजयोगासह अनेक योग जुळले, महत्त्व, भाग्यशाली राशी...
Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget