Astrology : पुढील आठवड्यात बनतायत लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य योग; वृषभ राशीसह 5 राशींची होणार भरभराट, वाढेल धन-संपत्ती
Lucky Zodiacs for Next Week : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अनेक शुभ योग तयार होत आहेत. हा आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे. वृषभ राशीसह 5 राशींना आर्थिक लाभासोबत अनेक चांगल्या संधी मिळतील. अशा परिस्थितीत, पुढील आठवड्यातील 5 भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया.

Astrology 25 To 31 December 2023 : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शुक्र, मंगळ, बुध आणि गुरुसह चार ग्रहांचं भ्रमण होणार आहे. डिसेंबरचा शेवटचा आठवडा ग्रह संक्रमणाच्या दृष्टीने अतिशय शुभ असणार आहे. बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योगही या आठवड्यात राहतील. अशा परिस्थितीत हा आठवडा 5 राशींसाठी (Zodiac Signs) खूप भाग्यवान ठरणार आहे. वृषभ राशीसह 5 राशींना आर्थिक लाभासोबत अनेक चांगल्या संधी मिळतील.
वृश्चिक राशीत शुक्राच्या मार्गक्रमणाने या आठवड्याची सुरुवात होत आहे. तसेच या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शुक्र आणि चंद्राचा समसप्तक योगही तयार होत आहे. यासोबतच या आठवड्यात बुद्धादित्य योगही असेल. हा योग आठवड्याच्या मध्यापर्यंत राहणार आहे. तसेच या योगावर बृहस्पतिची नववी दृष्टी असेल, ज्यामुळे शुभ गोष्टींत वाढ होईल. तसेच या आठवड्याच्या शेवटी शुक्र आणि बुध यांचं एकत्र वृश्चिक राशीत होणारं मार्गक्रमण लक्ष्मी नारायण योग तयार करेल. अशा परिस्थितीत, डिसेंबरचा शेवटचा आठवडा वृषभ, सिंह, तूळ राशीसह 5 राशींसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे. या आठवड्यातील भाग्यशाली राशी कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
डिसेंबरचा शेवटचा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. या आठवड्यात तुमचा मित्र तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या मित्राच्या मदतीने तुम्ही या आठवड्यात कोणतेही प्रलंबित काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. या राशीचे लोक जे राजकारणाशी निगडीत आहेत त्यांना काही महत्वाची जबाबदारी मिळू शकते. जे लोक खूप दिवसांपासून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत होते, त्यांची इच्छा पूर्ण होईल. काही नवीन कामाला सुरुवात झाल्याने मनात उत्साह राहील. आठवड्याचा शेवट आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी खूप शुभ आहे. कौटुंबिक वातावरणही या आठवड्यात अनुकूल राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा आठवडा शुभ आणि सौभाग्य देणारा आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या अनेक मोठ्या समस्या सुटू शकतात. तुमची प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने तुम्हाला आरामही वाटेल. व्यावसायिक लोकांना या आठवड्यात अपेक्षित यश मिळेल. या आठवड्याच्या मध्यात जमीन आणि घराशी संबंधित वाद काही प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने मिटतील. तसेच या काळात प्रभावशाली लोकांच्या मदतीने तुमचे जमिनी आणि मालमत्तेशी संबंधित सर्व वाद मिटवले जातील. तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत खूप आनंददायी वेळ घालवाल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नातेवाईकांसोबत आनंदात जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही जवळचे मित्र मंडळी किंवा कुटुंबासह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. हा प्रवास तुमच्यासाठी खूप आनंददायी आणि मनोरंजक असेल. नोकरदार लोकांना नवीन आणि चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील. नोकरदार लोकांसाठी आठवडा खूप चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उपलब्ध होतील. समाजसेवेत सहभागी असलेल्या लोकांना या आठवड्यात खूप मान-सन्मान मिळेल. या आठवड्यात नशीब पूर्ण साथ देईल, त्यामुळे तुमची सर्व नियोजित कामे पूर्ण होतील. पूर्वीच्या कोणत्याही योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे फायदे होतील. त्याच वेळी, या आठवड्यात तुमचे वैवाहिक जीवन खूप आनंददायी असणार आहे.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीचे लोक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या वाणी आणि बुद्धीने एखादे मोठे काम पूर्ण करण्यात यशस्वी होतील. नोकरदार लोकांना या आठवड्याच्या सुरुवातीला काही मोठे यश किंवा सन्मान मिळू शकतो. तसेच या आठवड्यात तुम्हाला वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. या आठवड्यात तुमच्याकडे उत्पन्नाचे विविध स्रोत असतील. गुंतवणूक करणाऱ्या लोकांना अचानक मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. तुम्हाला जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याच्या अनेक संधी मिळतील.
मीन रास (Pisces)
वर्षाचा शेवटचा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी आनंद देणारा आहे. या आठवड्यात तुम्हाला तो आनंद मिळू शकेल, जो तुम्ही खूप दिवसांपासून मिळवण्याचा प्रयत्न करत होता. या आठवड्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. जर तुम्ही परदेशी करिअर किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला या बाबतीत काही मोठे यश मिळू शकते. घर आणि ऑफिसमध्ये नोकरदार महिलांचा सन्मान वाढेल. या आठवड्यात तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल, ज्याच्या मदतीने तुम्हाला भविष्यात फायदेशीर योजनांमध्ये सहभागी होऊ शकता. लव्ह लाईफमध्ये दोघांमधील विश्वास आणि जवळीक वाढेल. वैवाहिक जीवन खूप आनंददायी असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
New Year 2024 : 'या' शुभ दिवसाने होणार नववर्षाची सुरुवात; सुख-समृद्धी आणि सौभाग्यासाठी करा 'हे' उपाय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
