एक्स्प्लोर

New Year 2024 : 'या' शुभ दिवसाने होणार नववर्षाची सुरुवात; सुख-समृद्धी आणि सौभाग्यासाठी करा 'हे' उपाय

New Year Remedies 2024: नवीन वर्षाची सुरुवात अतिशय शुभ दिवसाने होणार आहे. यंदा सोमवारपासून नवीन वर्ष सुरू होत आहे. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. अशा स्थितीत या दिवशी काही ज्योतिषीय उपाय करून तुम्ही भगवान शंकराला प्रसन्न करू शकता.

New Year 2024 : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. 2023 अगदी काही दिवसांत संपणार आहे. सोमवारपासून नवीन वर्षाची, म्हणजेच 2024 ची (New Year 2024) सुरुवात होत आहे. प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत, आठवड्याचे सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात. पण इतर दिवसांच्या तुलनेत सोमवार काही खास असतो. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे हे अगदी सर्वांनाच माहीत आहे. अशा स्थितीत शंकराला जल अर्पण करून नवीन वर्षाची शुभ सुरुवात करता येते.

सुख-समुद्धीसाठी करा हा उपाय

असं म्हणतात की, भगवान शिव किंवा भगवान शंकर हा एकमेव देव आहे जो अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे. भक्तांच्या खऱ्या भक्तीने महादेव प्रसन्न होऊ शकतात. नियमित एक कलश पाणी अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होऊ शकतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्ही मिळवू शकतात. महादेवाला जलाभिषेक करून नवीन वर्षाची सुरुवात केल्यास तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल.

जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त

ज्योतिषशास्त्रानुसार, 1 जानेवारी 2024 रोजी जलाभिषेकचा शुभ मुहूर्त सकाळी 6:33 पासून सुरू होईल आणि सकाळी 7:56 पर्यंत राहील. योग्य वेळी भगवान शंकराला जल अर्पण करणे लाभदायक ठरेल, यामुळे नवीन वर्षाची सुरुवात चांगली होईल. यासोबतच या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करायला विसरू नका. 

शंकराला अर्पण करा या वस्तू

भगवान शंकराला बेलपत्र खूप आवडतं, त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महादेवाला बेलपत्र अर्पण करायला विसरू नका. भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो, यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या क्षणार्धात दूर होतील. याशिवाय कोणत्याही पांढऱ्या रंगाची वस्तूही भगवान शंकराला अर्पण केली जाऊ शकते. 

दानधर्माने करा नवीन वर्षाची सुरुवात

नवीन वर्षाची सुरुवात परोपकाराने, दान-धर्माने केलेली चांगली. अशा परिस्थितीत, तुम्ही सोमवारी दही, पांढरे कपडे, साखर, दूध इत्यादी दान करू शकता. थंडीपासून बचाव करण्यासाठी हिवाळ्यात पांढऱ्या रंगाचे उबदार कपडे गरिबांना दान करता येतात. या दिवशी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप केल्याने शुभ फल प्राप्त होते. शिव चालिसाचे 108 वेळा सतत पठण केल्याने तुम्हाला भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : नवीन वर्षात शनि 3 वेळा बदलणार आपली चाल; 'या' राशींना बक्कळ लाभ, होणार धनवर्षाव

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 November 2026: आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा नवीन आठवडा एक टर्निंग पॉईंट! आर्थिक, करिअरबाबत सोन्याचे दिवस? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
तूळ, वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा नवीन आठवडा एक टर्निंग पॉईंट! आर्थिक, करिअरबाबत सोन्याचे दिवस? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Dev Diwali 2026: 'देव दिवाळी' येतेय..23 की 24 नोव्हेंबर तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, महत्त्व, परंपरा...
देव दिवाळी' येतेय..23 की 24 नोव्हेंबर तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, महत्त्व, परंपरा...
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहात 'ऊसाचे' महत्त्व जाणून थक्क व्हाल! यामागे दडलंय खास धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा अन् बरंच काही...
तुळशी विवाहात 'ऊसाचे' महत्त्व जाणून थक्क व्हाल! यामागे दडलंय खास धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा अन् बरंच काही...

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget