(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : प्रेमात वारंवार फसवणूक होतेय तर सावधान! शनि-मंगळची चाल, ज्योतिषशास्त्रात म्हटंलय...
Astrology : तुम्हालाही प्रेमसंबंधात तसेच वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील, तर हे ग्रह तुमच्या कुंडलीत अडचणी निर्माण करत आहेत, जाणून घ्या उपाय.
Astrology : अनेकदा लोकांना प्रेमसंबंधांमध्ये (Love Relationshiop) विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कधीकधी सर्व काही ठीक चालले असताना अचानक समस्या किंवा भांडणे सुरू होतात. चांगल्या प्रेम जीवनासाठी तसेच चांगल्या नातेसंबंधासाठी परस्पर सहकार्य आणि प्रेम आवश्यक आहे, परंतु जेव्हा या नात्यात भांडणे, आणि समस्या उद्भवू लागतात तेव्हा समजून घ्या की तुमच्या ग्रहांची स्थिती काहीशी वाईट आहे. तुम्हालाही प्रेमसंबंधात तसेच वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील, किंवा प्रेमामुळे तुमचे मन दुखावले जात असेल, तर हे ग्रह तुमच्या कुंडलीत अडचणी निर्माण करत आहेत, जाणून घ्या उपाय.
शनि आणि मंगळाची चलबिचल
जर तुम्हाला प्रेमात अडचणी येत असतील तर, याचा अर्थ तुमच्या पत्रिकेत शनि आणि मंगळाची चलबिचल आहे. तुमच्या पत्रिकेतील 7 वे घर तुमचे प्रेम संबंध किंवा वैवाहिक जीवन यशस्वी होईल की नाही हे स्पष्ट करते. जर शनि, मंगळ, राहु किंवा केतू तुमच्या कुंडलीतील 7 व्या स्थानावर दिसत असतील तर, याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनात तुम्हाला अडचणी येत आहेत.
दोन ग्रहांची एकत्र उपस्थिती
मंगळ आणि शनीचा संयोग 7 व्या घरात एक अडचणीची परिस्थिती दर्शवतो. मंगळ हा अग्नीचा कारक आहे आणि शनि तेलाचा कारक आहे. या दोघांची सांगड घातली तर आगीत इंधन भरल्याची परिस्थिती निर्माण होते. या दोन ग्रहांची एकत्र उपस्थिती एखाद्या व्यक्तीचे प्रेम जीवन बिघडवते. जर हे दोन ग्रह एकत्र असतील तर ते भांडणाचे कारण बनते. जाणून घ्या मंगळ आणि शनीचे ते उपाय, ज्याद्वारे तुम्ही तुमचे प्रेमजीवन सुधारू शकता
शनि आणि मंगळाचे उपाय
शनि, मंगळ किंवा मंगळ दोष यांचा संयोग किंवा दृष्टी संबंधांपासून मुक्त होण्यासाठी, मंगळदेवाचे ध्यान करा.
मंगळ ध्यान मंत्राचा जप करा - रक्तमाल्यांबरधरः शक्तिशूल गदाधरः। चतुर्भुज रक्त रोमा वरदः स्याद् धरासुतः।।
सूर्योदयाच्या वेळी या मंत्राचा जप करा.
शनिवारी तुमच्या जोडीदारासोबत शनी मंदिरात जा
दोघांनी मिळून शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण केले तर आपापसातील मतभेद दूर होतील, असे केल्याने शनिदेवाची कृपा होईल.
शनिवारी काळ्या कपड्यात काळे तीळ बांधून तीळाच्या तेलात बुडवून मातीच्या दिव्यावर ठेवा आणि तो दिवा शनिदेवाच्या मंदिरात लावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :