(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Libra July Horoscope 2024 : तूळ राशीला जुलै महिन्यात मिळणार गुड न्यूज; मंगळाच्या संक्रमणामुळे नोकरी-व्यवसायात प्रगती, जाणून घ्या मासिक राशीभविष्य
Libra July Horoscope 2024, Monthly Horoscope : तूळ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना नेमका कसा असणार? तुमची आर्थिक स्थिती, कौटुंबिक स्थिती कशी असणार? जाणून घ्या
Libra July Horoscope 2024, Monthly Horoscope : जुलै महिन्यात तुम्हाला चांगली बातमी मिळेल, परंतु या महिन्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. या काळात अति बोलल्याने प्रेम संबंध खराब होऊ शकतात, त्यामुळे वाद टाळा. नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना जुलै महिन्यात त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल आणि पैसेही योग्य ठिकाणी गुंतवले जातील. तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी जुलै महिना नेमका कसा असणार? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
कसा असेल पहिला आठवडा? (Libra July Month Horoscope)
जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. तुमची प्रतिमा खराब करण्याचा कोणीतरी प्रयत्न करू शकतं. अनेक गुंतागुंतीची कामं आज सोपी होतील. विचार न करता कोणतंही मोठं पाऊल उचलणं टाळा. तुमच्या जोडीदाराची आणि तुमची तब्येत बिघडण्याची चिनंहे आहेत. व्यवसायात नफा संभवतो. आईच्या पाठिंब्याने मोठा फायदा होईल, अनेक नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत.
कसा असेल दुसरा आठवडा? (Libra July Month Horoscope)
कुटुंबातील प्रत्येकावर टिप्पणी केल्यास कौटुंबिक वातावरणावर नकारात्मक परिणाम होईल. दुसऱ्या आठवड्यात आत्मविश्वास वाढेल. अतिउत्साह दाखवण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवा. किरकोळ आजार किंवा किरकोळ अपघात होण्याचीही शक्यता आहे. व्यावसायिक संबंध सुधारतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कसा असेल तिसरा आठवडा? (Libra July Month Horoscope)
तिसऱ्या आठवड्यात आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक उपयोगी पडेल. तुम्हाला काही अनपेक्षित व्यवसाय लाभ मिळेल. वरिष्ठांच्या सहकार्याने अनेक कामं पूर्ण होतील. पालकांची तब्येत बिघडेल. मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या.
कसा असेल चौथा आठवडा? (Libra July Month Horoscope)
चौथा आठवड्यात तुमचं चौफेर कौतुक होईल. भौतिक सुखात वाढ होण्याचे संकेत आहेत. फालतू बोलून वेळ वाया घालवू नका. तुमच्या प्रतिमेबद्दल सावध राहा, अन्यथा काही नुकसान होऊ शकतं. समाजातील सर्वांशी चांगले संबंध ठेवा. कामात येणारे अडथळे दूर होतील. आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :