Leo Horoscope Today 02 June 2023 : नोकरीत प्रगती, घरी पाहुण्यांचं आगमन; सिंह राशीसाठी आजचा दिवस चांगला
Leo Horoscope Today 02 June 2023 : आज कौटुंबिक वातावरण खूप आनंददायी असेल. आज कुटुंबातील सर्व सदस्य कुठेतरी फिरायला जाऊ शकतात.
Leo Horoscope Today 02 June 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. राजकारणात (Politics) करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. जे लोक घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. नोकरदारांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. उच्च अधिकाऱ्यांशी बोलण्यात गोडवा ठेवा. तब्येतीची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या अनुकूल राहील. हा दिवस सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो. दिवसभरात तुम्ही भविष्यासाठी चांगल्या योजना आखू शकता. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले तर सर्व कामे पूर्ण होतील.
सभांना संबोधित करण्याची संधी मिळणार
व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. राजकारणात नवीन अधिकारी भेटतील. राजकारणात असलेल्यांसाठी काही सभांना संबोधित करण्याचीही संधी मिळेल. आज तुम्हाला कार्यात वरिष्ठ नेत्यांची साथ मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला पालकांशीही ओळख करुन देऊ शकता. व्यावसायिक स्तरावर निर्माण झालेल्या अडचणींवर मात करता येईल.
आज कौटुंबिक वातावरण खूप आनंददायी असेल. आज कुटुंबातील सर्व सदस्य कुठेतरी फिरायला जाऊ शकतात. सिंह राशीच्या लोकांचे संबंध सुधारण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे. काही जुन्या गोष्टींवर कुटुंबात तणावाची परिस्थिती उद्भवू शकते. मात्र, संध्याकाळी घरी पाहुण्यांच्या आगमनाने घरातील वातावरण प्रसन्न राहील. तसेच, धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींत मन रमवा. यामुळे तुम्हाला शांती मिळेल.
आज सिंह राशीसाठी आरोग्य
आजच्या दिवशी पोटाचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आजच्या दिवशी आरोग्याची काळजी घ्या आणि योग्य आहाराचं सेवन करा.
सिंह राशीसाठी आजचे उपाय
लक्ष्मीदेवीचे ध्यान करा आणि पठण करा. संध्याकाळच्या वेळी दारात तूपाचा दिवा लावा.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :