एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Lakshmi Pujan 2025 : लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या पूजा, विधी आणि पूजनाची A to Z माहिती, ज्योतिषशास्त्र

Lakshmi Pujan 2025 : डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी लक्ष्मीपूजनाची पूजा, विधी आणि त्याची तयारी कशी करावी हे सांगितलं आहे ते सविस्तर जाणून घेऊयात. 

Lakshmi Pujan 2025 : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीच्या (Diwali 2025) पाच दिवसांना फार महत्त्व असते. त्यातलाच एक मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan 2025). अश्विन महिन्याच्या अमावस्येला संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची पूजा केली जाते. अशा वेळी डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी लक्ष्मीपूजनाची पूजा, विधी आणि त्याची तयारी कशी करावी हे सांगितलं आहे ते सविस्तर जाणून घेऊयात. 

लक्ष्मीपूजन विधी (Lakshmi Pujan Vidhi 2025)

लक्ष्मीपूजन साधारणपणे अश्विन महिन्याच्या अमावास्येला (दिवाळीच्या मुख्य दिवशी) प्रदोष काळात (सूर्यास्तानंतरचा काळ) केले जाते.

लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त 2025 (Lakshmi Puja Shubh Muhurta 2025)

मंगळवारी 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन करावे. तसेच, अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथीच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळ अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटांच्या कालावधीत लक्ष्मीपूजन करावे. 

1. लक्ष्मीपूजनाची तयारी :

  • घर आणि पूजेची जागा पूर्णपणे स्वच्छ करावी.
  • दारावर तोरण आणि घरात रांगोळी काढावी.
  • पूजेपूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.

मांडणी :

  • एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे.
  • त्यावर तांदळाचे लहानसे आसन/चौरस तयार करून त्यावर कलश (पाणी भरलेला आणि त्यावर नारळ ठेवलेला तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या) स्थापित करावा. कलशाभोवती आंब्याचे डहाळे ठेवावेत.
  • कलशाच्या डाव्या बाजूला हळदीने कमळ काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा.
  • लक्ष्मी देवीसमोर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून स्थापना करावी. (कारण प्रत्येक शुभकार्याची सुरुवात गणपती पूजनाने होते.)
  • याच आसनावर सोने-चांदीचे दागिने, पैसे, नाणी, व्यवसायाची कागदपत्रे/खातेवही (चोपडा) इत्यादी ठेवून त्यांचीही पूजा करावी.
  • पूजेसाठी लागणारे साहित्य (हळद-कुंकू, चंदन, अक्षता, फुले, धूप, दीप, नैवेद्य, फळे, विड्याची पाने, सुपारी, पंचामृत) जवळ ठेवावे.
  • दिवा लावावा (हे पूजेचे महत्त्वाचे अंग आहे).

2. पूजन विधी : (Lakshmi Puja Vidhi 2025)

आचमन व संकल्प : आचमन करून पूजेचा संकल्प करावा.

गणपती पूजन : सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी. हळद-कुंकू, अक्षता, दुर्वा व फुले अर्पण करावीत आणि 'ॐ गं गणपतये नमः' चा जप करावा.

कलश आणि इतर देवतांचे पूजन : कलश, तसेच इतर देवतांना (कुबेर इ.) नमस्कार करून त्यांचे पूजन करावे.

लक्ष्मी देवीचे पूजन (षोडशोपचार पूजा) :

  • लक्ष्मी देवीला हळद, कुंकू, चंदन लावावे.
  • कमळाचे फूल किंवा इतर शुभ्र फुले अर्पण करावीत.
  • पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर यांचे मिश्रण) आणि शुद्ध पाण्याने मूर्तीला स्नान घालावे.
  • वस्त्र, आभूषण, आणि गंध अर्पण करावे.
  • धूप, दीप (दिवा) प्रज्वलित करावा.
  • 'ॐ महालक्ष्म्यै नमः' किंवा लक्ष्मी मंत्राचा जप करावा.

नैवेद्य : गोड पदार्थ (खिरी/मिठाई) आणि विशेषतः लाह्या व बत्तासे यांचा नैवेद्य अर्पण करावा. फळे आणि विड्याची पाने-सुपारी अर्पण करावी.

आरती : गणेश आणि लक्ष्मी देवीची आरती करावी.

प्रार्थना : पूजेत काही चूक झाली असल्यास क्षमा मागावी आणि घरात सुख-समृद्धी, ऐश्वर्य नांदण्यासाठी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी.

3. समाप्ती :

पूजेनंतर प्रसाद सर्वांना वाटावा आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी रात्रभर दिवा (दिवाळीच्या रात्री) तेवत ठेवावा.
याव्यतिरिक्त, लक्ष्मीपूजनाच्या रात्री काही ठिकाणी अलक्ष्मी (दारिद्र्य) निस्सारण करण्यासाठी झाडूचे पूजन करून मध्यरात्री घराची साफसफाई करून कचरा घराबाहेर टाकण्याची परंपरा आहे, जी शुभ मानली जाते.

डॉ. भूषण ज्योतिर्विद

Mangal And Budh Yuti 2025 : तब्बल 100 वर्षांनी दिवाळीला जुळून येणार मंगळ-बुध ग्रहाची युती; 'या' 3 राशींची होणार चांदीच चांदी, पडणार पैशांचा पाऊस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kopargaon Election 2025: कोपरगावमध्ये पुन्हा काळे-कोल्हेंची फाईट, राष्ट्रवादी, भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; शिंदे गट व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
कोपरगावमध्ये पुन्हा काळे-कोल्हेंची फाईट, राष्ट्रवादी, भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; शिंदे गट व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
Mumbai Rada Video : मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
Bihar Election: नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
Bihar Vidhansabha Result बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal on Bihar Election :बिहारमध्ये काँग्रेसचं काय चुकलं? हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
Vijay Wadettiwar On Bihar Result :त्यांचा विजय होणारच होता,बिहार निकालावर वडेट्टीवार असं का म्हणाले?
Harshwardhan Sapkal on Bihar Election : महाविकास आघाडीत कोणतंही भांडणं नाही, सपकाळ स्पष्टच म्हणाले..
BJP Celebration : एनडीएला बिहारमध्ये घवघवीत यश,  भाजपकडून जल्लोष साजरा
Sudhir Mungantiwar On Bihar Result : 2014 पासून बिहारच्या विकासाला गती मिळाली - मुनगंटीवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kopargaon Election 2025: कोपरगावमध्ये पुन्हा काळे-कोल्हेंची फाईट, राष्ट्रवादी, भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; शिंदे गट व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
कोपरगावमध्ये पुन्हा काळे-कोल्हेंची फाईट, राष्ट्रवादी, भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; शिंदे गट व मविआची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
Mumbai Rada Video : मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
Bihar Election: नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
नितीश कुमारांच्या पक्षाचं ते ट्विट डिलिट झालं, मुख्यमंत्रीपदामुळे बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा ट्विस्ट येणार?
Bihar Vidhansabha Result बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंचे 2.0 मिशन! थोरातांच्या नेतृत्वात रिंगणात उतरणार; पत्नी मैथिली तांबेंचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत
Bihar Election Result 2025 बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
बिहार विधानसभा ट्रेलर, मुंबई महापालिका खरा पिच्चर, भाजपची प्रतिक्रिया; सुषमा अंधारेंचा पलटवार
Pune Crime News: आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली;  नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली; नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
Bypoll Election Results 2025: बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
Embed widget