Kharmas 2024 : 15 डिसेंबरपासून सुरु होणार खरमास, शुभ कार्य करण्यासाठी 'हे' 2 दिवस खास; वाचा मुहूर्त आणि योग
Kharmas 2024 : खरमासाची सुरुवात 15 डिसेंबर रविवारपासून होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला एखादं शुभ कार्य करायचं असे तर त्यासाठी हे दोन दिवस शुभ आहेत.
Kharmas 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य देव जेव्हा गुरुची रास धनु किंवा मीन राशीत प्रवेश करतात तेव्हापासून खरमासचा काळ सुरु होतो. खरमासच्या काळात कोणतंही काम करणं शुभ मानलं जात नाही.खरमासमध्ये पूजा पाठ, विवाह, मुंडन, गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य केले जात नाही
यावर्षी खरमासाची सुरुवात 15 डिसेंबर रविवारपासून होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला एखादं शुभ कार्य करायचं असे तर त्यासाठी हे दोन दिवस शुभ आहेत.
खरमासाची सुरुवात कधीपासून?
पंचागानुसार, सूर्य देव 15 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजून 19 मिनीटांनी धनु राशीत प्रवेश करणार आहे. या काळात धनु राशीची संक्रांती असेल आणि खरमास सुरु होईल.
खरमासाची समाप्ती
15 डिसेंबरला लागणारं खरमास संपूर्ण एका महिन्यापर्यंत असणार आहे. सूर्य देव 14 जानेवारी 2025 रोजी मकर राशीत सकाळी 9 वाजून 3 मिनिटांनी प्रवेश करणार आहे. या काळात मकर संक्रांती असेल. त्याचबरोबर खरमासाची समाप्ती होईल.
शुभ मुहू्र्त आणि योग
गजकेसरी योग - दुपारी 3 वाजून 4 मिनिटांपासून
रवि योग - सकाळी 7.50 ते सकाळी 05.48 पर्यंत
शिव योग - पहाटेपासून ते 11.54 पर्यंत
सिद्ध योग - 11.54 पासून ते रात्री उशिरापर्यंत
ब्रह्म मुहूर्त ० 05.16 ते 06.11 पर्यंत
14 डिसेंबर शुभ मुहूर्त आणि योग
गजकेसरी योग - संपूर्ण दिवस
सर्वार्थ सिद्धी योग - सकाळी 07.06 पासून ते 15 डिसेंबर 03.54 पर्यंत
अमृत सिद्धी योग - सकाळी 07.06 ते 15 डिसेंबर 03.54 पर्यंत
सिद्ध योग - पहाटेपासून ते सकाळी 08.27 पर्यंत
साध्य योग - सकाळी 08.27 ते 15 डिसेंबर सकाळी 05.07 पर्यंत असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :