Ketu Budh Yuti 2025 : तब्बल 18 वर्षांनंतर जुळून येणार बुध आणि केतूचा दुर्लभ संयोग; 'या' राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, हातात खेळेल पैसा
Ketu Budh Yuti 2025 : ऑगस्ट महिन्यात बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी केतू ग्रह आधीपासूनच विराजमान आहे.

Ketu Budh Yuti 2025 : वैदिक पंचांगानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीने संक्रमण करतात. तसेच, या संक्रमणा दरम्यान त्यांची इतर ग्रहांबरोबर युती होते. याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. ऑगस्ट महिन्यात बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी केतू (Ketu) ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. यामुळे सिंह राशीत केतू आणि बुध ग्रहाची युती होणार आहे. यामुळे काही राशींचं नशीब उजळणार आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी केतू आणि बुध ग्रहाचा संयोग सकारात्मक ठरणार आहे.सिंह राशीत हे संक्रमण होत असल्या कारणाने या राशीच्या कुंडलीच्या प्रथम भावात हे संक्रमण होणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, तुमच्या आनंदाला कोणतीच सीमा राहणार नाही. करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्ही जी मेहनत घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
केतू आणि बुध ग्रहाच्या युतीने वृश्चिक राशीच्या लोकांना याचे शुभ परिणाम मिळतील. या राशीच्या करिअरचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. तसेच, नवीन व्यक्तींशी भेटीगाठी वाढतील. मुलांचं अभ्यासात मन रमेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतील.
धनु रास (Sagittarius Horoscope)
केतू आणि बुध ग्रहाच्या संयोगाने या राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळतील. या राशीच्या भाग्य स्थानी ही युती होणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुमचं नशीब बदलण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे प्रवासाला जाण्याचे योग देखील जुळून येणार आहेत. तुम्हाला मानसिक शांती लाभेल. सामंजस्याने व्यवहार कराल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मित्रांचा सपोर्ट तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















