एक्स्प्लोर
Guru Asta 2025 : गुरु ग्रह बृहस्पतीचा होतोय अस्त, शुभ कार्य करण्याची हीच संधी, अन्यथा 5 महिन्यांपर्यंत पाहावी लागेल वाट
Guru Asta 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रहाला शुभ कार्याचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळेच जर लग्नसमारंभ, मुंज किंवा एखाद्या शुभ कार्याचं आयोजन करायचं असेल तर गुरु ग्रहाचा उदय होणं गरजेचं आहे.
Guru Asta 2025
1/8

2025 या वर्षात गुरु ग्रह कधी अस्त होणार आहेत ते जाणून घेऊयात.
2/8

ज्योतिष शास्त्रानुसार,जेव्हा एखादा ग्रह ग्रहांचा राजा सूर्यापासून एका विशिष्ट अंतरावर येतो, तेव्हा तो सूर्याच्या प्रभावामुळे कमकुवत होतो. यालाच ग्रहांचा अस्त होणं म्हणतात.
3/8

जेव्हा गुरु ग्रह अस्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव कमी होतो आणि शुभ कार्यात यश मिळत नाही.
4/8

6 जुलै 2025 रोजी देवशयनी एकादशी आहे. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. चातुर्मासात शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते. त्यामुळे जर तुम्हाला तुम्हाला जर कोणतं कार्य करायचं असेल तर 11 जूनच्या आधी करा. अन्यथा 5 महिने म्हणजेच देवउठनी एकादशीपर्यंत वाट पाहावी लागेल.
5/8

गुरु ग्रह अस्त होण्याआधी लग्न, उदयापन, गृहप्रवेश, उपवासाची सुरुवात यांसारखी शुभ कार्य करुन घ्या.
6/8

देवउठनी एकादशी 1 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. या दिवशी चातुर्मास संपणार आणि शुभ कार्याची सुरुवात केली जाणार.
7/8

जेव्हा गुरु अस्त होतो तेव्हा पिंपळाच्या झाडात ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरुवे नमः।। या मंत्राचा जप करुन जल चढवा. यामुळे बृहस्पती ग्रहाचा शुभ प्रभाव राहील.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 04 Jun 2025 11:21 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















