Kendra Trikon Rajyog 2025 : शनिच्या केंद्र त्रिकोण राजयोगाने उजळणार भाग्य; 'या' 5 राशींवर पडणार पैशांचा धो-धो पाऊस, करिअरची गाडीही सुस्साट
Kendra Trikon Rajyog 2025 : आजच्या दिवशी शनि, चंद्र आणि गुरु ग्रहाबरोबर केंद्र त्रिकोण योगसुद्धा जुळून येणार आहे. या व्यतिरिक्त आजच्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रासह सुकर्मा योगदेखील जुळून येणार आहे.

Kendra Trikon Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 22 नोव्हेंबर 2025 चा दिवस आहे. तसेच, आजच्या दिवशी एक मोठा दुर्लभ संयोग जुळून येणार आहे. तसेच, आज शनिवारच्या दिवशी शनि (Shani Dev), चंद्र आणि गुरु ग्रहाबरोबर केंद्र त्रिकोण योगसुद्धा जुळून येणार आहे. या व्यतिरिक्त आजच्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रासह सुकर्मा योगदेखील (Yog) जुळून येणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, हा योग पाच राशीच्या लोकांसाठी फार लाभदायी ठरु शकतो. या योगामुळे राशींना धनलाभही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी विशेषत: हा काळ फार सुखद असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, सकारात्मक वातावरण राहील. तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
तुम्हाला तुमच्या कामातून मिळालेल्या यशामुळे तुमचं मन उत्साही राहील. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. पार्टनरबरोबर सुरु असलेला दुरावा मिटेल. तसेच, वैवाहिक जीवन सुरळीत चालेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी हा काळा फार चांगला असणार आहे. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळेल. वरिष्ठ लोकांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असणार आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या कालावधीत नोकरीत तुमची स्थिती फार चांगली राहील. सहकाऱ्यांचा देखील तुम्हाला सपोर्ट मिळेल. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. आर्थिक स्थिती लाभदायक ठरेल. जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक असणार आहे. तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. तसेच, फिरण्याची आवड निर्माण होईल. कर्मावर जास्त विश्वास ठेवाल, इतरांच्या बोलण्यात अडकणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















