Kartik Purnima 2024 : कार्तिक पौर्णिमेपासून 'या' 3 राशींचे सुरु होणार 'अच्छे दिन'; मनातील इच्छा होतील पूर्ण
Kartik Purnima 2024 : 2024 मध्ये कार्तिक पौर्णिमा 15 नोव्हेंबर 2024, रोजी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी आहे. या दिवशी स्नान आणि दानाचं फार महत्त्व आहे.
Kartik Purnima 2024 : हिंदू धर्म मान्यतेनुसार, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा तिथीचं वेगळं असं महत्त्व आहे. पण, कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीचं महत्त्व इतर पौर्णिमा तिथीपेक्षा फार वेगळं आहे. 2024 मध्ये कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima) 15 नोव्हेंबर 2024, रोजी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी आहे. या दिवशी स्नान आणि दानाचं फार महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने पुण्य फळ मिळते. 2024 मध्ये पौर्णिमा तिथीनंतर अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. या दरम्यान कोणकोणत्या राशींचं भाग्य उजळणार ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष 2025 च्या कार्तिक पौर्णिमेपासून शुभ काळ सुरु होणार आहे. या दिवसापासून तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. तसेच, तुमच्या प्रगतीचे मार्ग वाढताना दिसतील. नात्यात विश्वास निर्माण होईल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. व्यवसायात धन-संपत्ती कमावण्याचे अनेक शुभ योग जुळून येणार आहेत.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा शुभकारक असणार आहे. या दिवशी ग्रहांच्या परिवर्तनामुळे तुम्ही शुभ कार्याची सुरुवात करु शकता. तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांची कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, प्रमोशनचे अनेक मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी कार्तिक पौर्णिमेचा काळ हा फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तुम्ही जिथे गुंतवणूक कराल त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून जे काम रखडले आहे ते पूर्ण होण्यास मदत होईल. कुटुंबियांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :