Kalashtami 2024 : राहु दोषापासून मुक्ती हवीय? तर कालाष्टमीला करा 'या' गोष्टींचं दान, पदरात पडेल पुण्य
Kalashtami 2024 : हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरवाची पूजा केली जाते. यासोबत या दिवशी काही गोष्टींचं दान केल्याने सर्व दोष दूर होतात.
Kalashtami 2024 : आज 30 मे, गुरुवार रोजी कालाष्टमी आहे. हिंदू धर्मात प्रत्येक तिथी अत्यंत शुभ मानली जाते. कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरवाची (Kalbhairav) विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे, या तिथीला कालाष्टमी (Kalashtami 2024) असं म्हणतात. या दिवशी भगवान शंकराच्या उग्र रूपाची पूजा केल्याने व्यक्तीला शुभ फल मिळू शकतं. तसेच मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या दिवशी अनेक लोक उपवास करतात. या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने कुंडलीतील राहु दोषापासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं. या दिवशी काही गोष्टींचं दान केल्याने विशेष फायदा होऊ शकतो, तो कसा? पाहूया
कालाष्टमीच्या दिवशी काळे वस्त्र दान करा
कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे. कालभैरवाला काळा रंग खूप आवडतो. त्यामुळे या दिवशी कालभैरवाची पूजा केल्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला काळ्या रंगाचे कपडे दान केल्यास फायदा होऊ शकतो. यामुळे तुम्हाला जीवनात सकारात्मक गोष्टी, शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात.
कालाष्टमीच्या दिवशी उडीद डाळ दान करा
कालाष्टमीच्या दिवशी उडीद डाळ दान केल्याने शनिदेवाची कृपा लाभते. उडदाच्या डाळीचा संबंध शनिदेवाशी आहे. त्यामुळे या दिवशी उडीद डाळ दान केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.
कालाष्टमीच्या दिवशी काळे तीळ दान करा
ज्योतिष शास्त्रामध्ये काळा तीळ शनि ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळे काळ्या तिळाचे दान केल्याने शनिदेवाची कृपा अबाधित राहते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. ग्रह दोषांपासूनही तुम्हाला आराम मिळू शकतो.
कालाष्टमीच्या दिवशी चपला दान करा
कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची पूजा योग्य प्रकारे केल्यास फायदा होऊ शकतो. जर तुमच्या कुंडलीत राहुची स्थिती कमकुवत असेल तर या दिवशी चपला दान केल्याने सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळू शकते. या उपायाने ग्रहांचा अशुभ प्रभावही टाळता येतो.
कालाष्टमीच्या दिवशी तांदूळ दान करा
कालाष्टमीच्या दिवशी तांदूळ दान केल्याने व्यक्तीला शुभ परिणाम मिळू शकतात. याशिवाय प्रेमविवाहात येणाऱ्या समस्यांपासूनही आराम मिळू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: