July Planet Transit 2024 : शुभ वार्ता! कर्क राशीत जुळून येणार अद्भूत युतीचा खेळ, 'या' 3 राशींना अचानक होणार धनलाभ, सुख-समृद्धीत होणार भरभराट
July Planet Transit 2024 : जुलैच्या पहिल्या आठवड्यात धन-दौलत, प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखाचा दाता शुक्र ग्रह संक्रमण करणार आहे. तर, 7 जुलैला संक्रमण करून तो कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
![July Planet Transit 2024 : शुभ वार्ता! कर्क राशीत जुळून येणार अद्भूत युतीचा खेळ, 'या' 3 राशींना अचानक होणार धनलाभ, सुख-समृद्धीत होणार भरभराट July Planet Transit 2024 surya shukra gochar in cancer horoscope these 3 zodiac signs people will get money and successful life July Planet Transit 2024 : शुभ वार्ता! कर्क राशीत जुळून येणार अद्भूत युतीचा खेळ, 'या' 3 राशींना अचानक होणार धनलाभ, सुख-समृद्धीत होणार भरभराट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/b64aa3572c3a4b0f75699726742790831719460547437358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
July Planet Transit 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै (July) महिन्यात अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे काही राशीच्या (Zodiac Signs) लोकांसाठी जुलै महिना फार खास असणार आहे. खरंतर, जुलैच्या पहिल्या आठवड्यात धन-दौलत, प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखाचा दाता शुक्र ग्रह संक्रमण करणार आहे. तर, 7 जुलैला संक्रमण करून तो कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर, 16 जुलै रोजी ग्रहांचा राजा सूर्यसुद्धा कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
सूर्य सध्या मिथुन राशीत आहे. सूर्य आणि शुक्र ग्रहाने कर्क राशीत संक्रमण करताच शुक्र-सूर्य युती होणार आहे. फार वर्षांनी जुळून आलेला हा शुभ संयोग 31 जुलैपर्यंत असणार आहे. 31 जुलै 2024 रोजी शुक्र ग्रह कर्क राशीतून बाहेर येऊन सिंह राशीत प्रवेश करणार आहे. पण, 16 ते 31 जुलैपर्यंतचा काळ तीन राशींसाठी फार शुभ असणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
सूर्य आणि शुक्र ग्रहाची युती कर्क राशीतच जुळून येणार आहे. त्यामुळे इतर राशींच्या तुलनेत या राशीच्या लोकांना सर्वात जास्त लाभ मिळणार आहे. या राशींच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच, तुम्ही तुमच्या बुद्धी आणि कौशल्याच्या आधारावर छान काम कराल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. पैसे कमाविण्याचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील. वैवाहिक जीवनात सुख-शांती असेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि सूर्याचं संक्रमण फार शुभकारक असणार आहे. या राशीच्या लोकांच्या पगारात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, पैसे कमावण्याचे अनेक स्त्रोत तुमच्यासमोर असतील. तुमच्या बॅंक बॅलेन्समध्ये चांगली वाढ होईल. तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. जोडीदाराबरोबर संसार अगदी सुखाचा असेल.
तूळ रास (Libra Horoscope)
शुक्र आणि सूर्याच्या युतीने या राशीच्या लोकांना चांगला फायदा होणार आहे. तुम्हाला करिअर संबंधित शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, जे तरूण अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या पगारात वाढ होईल. तसेच, व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Dev : पुढचे तब्बल 188 दिवस 'या' जन्मतारखेचे लोक जगतील राजासारखं आयुष्य; शनीची असणार शुभ दृष्टी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)