Jaya Ekadashi 2024 : आज जया एकादशी; शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि उपाय जाणून घ्या
Jaya Ekadashi 2024 : माघ शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला जया एकादशी म्हणतात. या एकादशीला भगवान विष्णूची विशेष पूजा केल्याने वाईट कृत्यं आणि पापांचा नाश होतो. जया एकादशीचं व्रत करून कुंडलीतील चंद्राचा अशुभ परिणाम टाळता येतो.
Jaya Ekadashi 2024 : हिंदू धर्मात एकादशी (Ekadashi) तिथीला खूप महत्त्व आहे. एकादशीचा विशेष दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे. पुराणात माघ महिना अत्यंत पुण्याचा मानला गेला आहे. यात माघ शुक्ल पक्षात येणाऱ्या जया एकादशी तिथीचं विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे. या दिवशी उपवास केल्याने जीवनात शांती मिळते आणि सुखाची प्राप्ती होती. यंदा ही जया एकादशी आज, म्हणजेच 20 फेब्रुवारीला पाळण्यात येत आहे.
माघ शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशीचं व्रत (Jaya Ekadashi 2024) केलं जातं. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. सुख-सौभाग्याच्या प्राप्तीसाठी जया एकादशीचं व्रत महत्त्वाचं मानलं जातं. जी व्यक्ती हे व्रत भक्तीभावाने करते तिला मोक्षप्राप्त होतो, असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे. याच जया एकादशी व्रताची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घेऊया.
जया एकादशी व्रताचं महत्त्व (Jaya Ekadashi Significance)
हिंदू पुराणात एकादशी तिथीला व्रत उपवास करण्याचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिर यांना या व्रताबद्दल सांगितलं होतं. हे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते. तसेच मानसिक आराम मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी उपवास करणं आवश्यक आहे.
जया एकादशी मुहूर्त (Jaya Ekadashi 2024 Muhurta)
पंचांगानुसार, जया एकादशी 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजून 49 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 20 फेब्रुवारीला जया एकादशीचं व्रत ठेवलं जाईल.
एकादशी व्रताची पारण वेळ (Jaya Ekadashi 2024 Vrat Time)
जया एकादशी व्रताची पारण वेळ 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजून 55 मिनिटं ते 9 वाजून 11 मिनिटं अशी असेल.
जया एकादशी पूजा विधी (Jaya Ekadashi 2024 Puja Vidhi)
- जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा.
- सकाळी लवकर अंघोळ करुन चांगले कपडे परिधान करा.
- सकाळी तुळशीला जल अर्पण करा.
- यानंतर भगवान विष्णूंची आराधना करा.
- शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवा.
- भगवान विष्णूंसमोर दिवा लावा, धूप लावा.
- तुळशीचं पान आणि पंचामृत अर्पण करा.
- विष्णू मंत्राचा जप करा.
- भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीचीही पूजा करा.
- देवाला फळ, फूल वाहा आणि अगरबत्ती लावा.
- विष्णू आणि लक्ष्मी देवीची आरती करा.
- देवाला नैवेद्य आणि प्रसाद दाखवा, त्यानंतर प्रसाद सर्वांना वाटा.
ग्रहांना शांत करण्याचा उपाय (Jaya Ekadashi Upay)
जया एकादशीला ग्रहांना शांत करण्यासाठी पूर्व दिशेला एका फळीवर पिवळं कापड पसरून ठेवा आणि त्यावर भगवान विष्णूचा फोटो स्थापित करा. देवासमोर धूप, दिवा लावा. फळं, फुलं, सुपारी इत्यादी अर्पण करा. उजव्या हातात पाणी घ्या आणि ग्रहांना शांत करण्यासाठी प्रार्थना करा. संध्याकाळी जया एकादशीची व्रत कथा ऐकावी आणि फळं खावीत. शक्य असल्यास रात्री भगवान विष्णूच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Jaya Ekadashi 2024 : जया एकादशीला चुकूनही करू नका 'ही' कामं; होणार नाही फलप्राप्ती