April horoscope 2022 : एप्रिलमध्ये 'या' राशीच्या लोकांना आरोग्य आणि संपत्तीची काळजी घ्यावी लागणार
April horoscope 2022 : एप्रिल महिना सर्व राशींसाठी खास आहे. धार्मिक दृष्टिकोनातूनही हा महिना महत्त्वाचा आहे.
April horoscope 2022 : ज्योतिष शास्त्रानुसार,एप्रिल महिना सर्व राशींसाठी खास असणार आहे. या महिन्यात अनेक महत्त्वाचे ग्रह त्यांची रास बदलणार आहेत. धार्मिक दृष्टिकोनातूनही हा महिना महत्त्वाचा आहे. एप्रिलमध्ये मिथुन, सिंह, तुळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी आरोग्य आणि संपत्तीची काळजी घ्यवी.
मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांनी या महिन्यात कोणत्याही विषयावर जास्त चिंतन केल्यास त्यांना मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:ला ताजेतवाने ठेवावे. कामासोबतच मिथुन राशीच्या लोकांना तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 10 तारखेनंतर खूप काळजीपूर्वक काम करावे लागणार आहे.
सिंह (Leo) : सिंह राशीच्या लोकांचा महिन्याच्या सुरुवातीला प्रतिस्पर्ध्यांसोबत वाद होऊ शकतो. सिंह राशीच्या लोकांसाठी नोकरी बदलण्याच्या दृष्टीने हा महिना अनुकूल आहे. या महिन्यात महिलांना आरोग्याच्या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागेल. सिंह राशीच्या लोकांना कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करता येईल. या राशीच्या लोकांनी घरातील मोठ्यांसोबत वेळ घालवावा.
तुळ (Libra) : तूळ राशीच्या लोकांनी तणावापासून दूर राहून शांततेला महत्त्व द्यावे. तूळ राशीच्या लोकांनी या महिन्यात कर्ज घेऊ नये. नोकरी शोधणार्यांना या महिन्यात अनेक कठीण आव्हानांचा सामना करावा लागेल. तसेच तूळ राशीच्या लोकांनी संतुलित आहार करणे गरजेचे आहे.
वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीच्या लोकांनी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन या महिन्यात कोणाशीही वाद घालू नये. तसेच जवळच्या व्यक्तींवर रागवू नये. वृश्चिक राशीच्या लोकांनी या महिन्यात आरोग्याकडे लक्ष द्यावे.
संबंधित बातम्या
Panchang 2 April 2022: आजपासून सुरू होतंय हिंदू नववर्ष, जाणून घ्या आजची तारीख, नक्षत्र आणि राहुकाल
Horoscope 2 April 2022 : चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी चमकणार ‘या’ राशींचं नशीब, जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Navratri 2022 : नवरात्रीत 'ही' चूक कधीही करू नका, रागावू शकते दुर्गा माता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha