Navratri 2022 : नवरात्रीत 'ही' चूक कधीही करू नका, रागावू शकते दुर्गा माता
Navratri 2022 : चैत्र नवरात्रीची सुरुवात 2 एप्रिल 2022 रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून होत आहे. नवरात्रीमध्ये नियम, शिस्त आणि स्वच्छतेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे
Navratri 2022 : नवरात्रोत्सव हा अत्यंत पवित्र सण मानला जातो. चैत्र महिन्यात येणारी नवरात्र खूप खास असते. चैत्र नवरात्रीची सुरुवात 2 एप्रिल 2022 रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून होत आहे.
नवरात्रीमध्ये दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये नियम, शिस्त आणि स्वच्छतेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये माँ दुर्गेच्या उपासनेमध्ये काही गोष्टींची काळजी घ्यावी, अन्यथा नुकसानही सहन करावे लागते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
वास्तुशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. नवरात्रीच्या पूजेने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, अशी श्रद्धा आहे.
नवरात्रीमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या
नवरात्रीच्या दिवसात स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. माँ दुर्गेच्या सर्व अवतारांना स्वच्छता अधिक आवडते. त्यामुळे नवरात्रीमध्ये स्वच्छतेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: ज्या घरांमध्ये मातेचे पद आणि कलशाची स्थापना केली जाते, त्या घरात स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते.
घरातील सर्व सदस्यांनी याची काळजी घ्यावी
नवरात्रीमध्ये घरातील सर्व सदस्यांनी शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारली पाहिजे. पूजा सुरू होण्यापूर्वी सर्व सदस्यांनी स्नान करावे आणि शक्य असल्यास सर्व सदस्यांनी एकत्र पूजा करावी. नवरात्रात मळलेले आणि फाटलेले कपडे घालू नयेत.
किचनमध्ये घाण भांडी ठेवू नका
नवरात्रीच्या काळात रात्री जेवल्यावर सर्व भांडी धुतली पाहिजेत याची विशेष काळजी घ्यावी. जेवणानंतर किचनमध्ये भांडी तशीच ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये लवकर प्रवेश करते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या
- Navratri 2022 Colours : 'हे' आहेत नवरात्रीचे नऊ शुभ रंग, जाणून घ्या दिवसानुसार रंगांचे महत्त्व
- Sade Tin Muhurta : हिंदू संस्कृतीत शुभकार्याची सुरूवात करण्याचे साडे तीन मुहूर्त कोणते? जाणून घ्या महत्व
- Gudi Padwa 2022 : इलेक्ट्रॉनिक वस्तू 10 ते 12 टक्क्यांनी महागल्या, तरी खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा
- Gudi Padwa 2022: गुढीपाडव्याविषयीच्या 'या' नवीन गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात