Horoscope Today, October 7, 2022 : मेष, मिथुनसह ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today, October 7, 2022 : मेष राशीच्या लोकांना आज धनलाभ होईल. तर, वृषभ राशीच्या लोकांना आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...
Horoscope Today, October 7, 2022 : आज चंद्र शतभिषा नक्षत्रात असून तो कुंभ राशीत आहे. गुरु मीन आणि सूर्य कन्या राशीत भ्रमण करत आहेत. चंद्र मकर राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना आज धनलाभ होईल. तर, वृषभ राशीच्या लोकांना आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळतील. करिअरमध्ये आलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी करत असलेल्या लोकांचे अधिकारी आज त्यांच्या पाठीमागे वाईट वागू शकतात. एखाद्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. नोकरीच्या ठिकाणी लोक आज चांगली कामगिरी करतील. रखडलेले पैसे परत मिळतील.
वृषभ (Taurus Horoscope) : वृषभ राशीच्या लोकांना आज थोडे सावध राहावे लागेल. आज कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याशी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात व्यावसायिकाशी मतभेद होऊ शकतात. तुमच्या कामाच्या कौशल्याने तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. तसेच आज तुम्ही घरगुती वापरातील एखादी आवडती वस्तू खरेदी करू शकता. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. व्यावसायिक प्रतिष्ठा चांगली राहील. रागावर नियंत्रण ठेवा.
मिथुन (Gemini Horoscope) : पैशाच्या कारणामुळे तुमचे कोणतेही काम थांबणार नाही. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. लोकांच्या मनात काय चालले आहे, ते तुम्हाला समजेल. वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात यश आणि समाधान मिळू शकते. कष्टाच्या जोरावर व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. खर्चाच्या बाबतीत मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक प्रश्न सहज सोडवता येतील.
कर्क (Cancer Horoscope) : आत्मविश्वासाची कमतरता राहील. व्यवसायात अडथळे येऊ शकतात. वडिलांकडून आर्थिक पाठबळ मिळू शकते. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. अनावश्यक भांडणापासून दूर राहा. आरोग्याबाबत सावध राहा. कामाच्या ठिकाणी अडचणी येतील. तब्येतीत सुधारणा होईल. बोलण्यावर संयम ठेवा. संभाषणात संतुलन राखा. कार्यक्षेत्रात बदल संभवतो.
सिंह (Leo Horoscope) : इतरांना प्रभावित करण्यासाठी आज अवाजवी खर्च करू नका. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ नाही. सामाजिक कार्यासाठी हा उत्तम दिवस आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आर्थिक बाबी सुधारतील. मुलांशी किंवा जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा आर्थिक संकट ओढवू शकते.
कन्या (Virgo Horoscope) : कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. आरोग्य उत्तम राहील. आजारी व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने आराम मिळेल. कामात यश मिळेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल. कामकाजात विरोधकांना नमते घ्यावे लागेल. आज एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. एखादे अपूर्ण काम पूर्ण होऊ शकते.
तूळ (Libra Horoscope) : आज कामाचा भार वाढेल. प्रवासाचा कार्यक्रम लांबणीवर टाका. आज प्रत्येक कामात काही ना काही अडचण येईल. आर्थिकदृष्ट्या, जे उपाय केले जात आहेत ते अपुरे असतील. मिळकतीपेक्षा खर्च जास्त होईल. विरोधक कामकाजात विश्रांती घेऊ देणार नाहीत. तुम्हाला कोणतीही हानी होणार नसली तरी कामाचा वेग कमी होईल. दुपारनंतर कामात यश मिळू शकते.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. कामाच्या ठिकाणी लोक तुमचे ऐकतील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतील. कार्यक्षेत्रात घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा तो तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो. तुमचा आणि तुमच्या जोडीदारामध्ये सुरू असलेला मतभेद संपवण्यासाठी नातेवाईक तुम्हाला मदत करू शकतात.
धनु (Sagittarius Horoscope) : धनु राशीचे लोक आज काहीसे प्रतिकूल राहू शकतात. तुम्ही तुमच्या संयमाने आणि सौम्य वर्तनाने वातावरण हलके करू शकाल. प्रिय व्यक्तीला मदत केल्यामुळे तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आजचा दिवस मनोरंजनात जाईल. मुलांमुळे किंवा त्यांच्या शिक्षणामुळे तुम्ही चिंतेत असाल. व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबी सुधारतील.
मकर (Capricorn Horoscope) : आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुम्हाला सन्मान मिळेल. व्यवहारात आणि प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक रहा. जुने मित्र आणि नातेवाईक यांच्याशी चर्चा होऊ शकते. तब्येत खराब होण्याची शक्यता आहे. तुमचा प्रवास यशस्वी होईल. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, फायदे आणि तोटे काळजीपूर्वक विचारात घ्या.
कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस शुभ आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही आनंदी राहाल. शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. कुटुंबियांसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम होईल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. नोकरदार लोक आपले काम सहजतेने पूर्ण करू शकतात. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल.
मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस खूप शुभ आहे आणि फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या प्रयत्नांना फळ मिळेल. नशीब तुमच्या बाजूने आहे. तुम्हाला इतर लोकांचे सहकार्य मिळेल. सुख-सुविधा वाढतील. महिलांसाठी आजचा दिवस चांगला आहे, त्यांना काही विशेष कारणामुळे मानसिक आनंद मिळेल. भेटवस्तूही मिळू शकतात. आज व्यवसायात नफा मिळेल मिळू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या