एक्स्प्लोर

Horoscope Today, July 5, 2022 : मेष, धनुसह ‘या’ राशींनी कामात दिरंगाई करणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today, July 5, 2022 : मेष राशीच्या लोकांनी कामात आधी लक्ष द्यावे. तर, वृषभ राशीचा लोकांनी पैशांचा वापर विचार करून करावा. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, July 5, 2022 : आज चंद्र सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात आहे. सूर्य आणि बुध सध्या मिथुन राशीत आणि गुरु मीन राशीत आहेत. तर, शनी कुंभ राशीत आहे. मेष राशीच्या लोकांनी कामात आधी लक्ष द्यावे. तर, वृषभ राशीचा लोकांनी पैशांचा वापर विचार करून करावा. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मानसिकदृष्ट्याही तुम्ही आनंदी राहाल. सर्जनशीलतेने काहीतरी नवीन करण्याच्या स्थितीत असाल. मन साहित्य आणि कलेमध्ये गुंतलेले असेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील. घरात शांततापूर्ण वातावरण राहील. दैनंदिन कामात काही अडथळे येतील. व्यवसाय आणि नोकरीत वाटाघाटी करताना काळजी घ्या. तथापि, अधिक श्रमाचे फळ कमी मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope) : आज पैशाचा वापर जपून करण्याची गरज आहे, अन्यथा मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. पैसे कुठेतरी गुंतवले, तर तिथून नुकसान होते. आपला आनंद इतरांसोबत शेअर केल्याने आरोग्यही सुधारेल. परंतु, लक्षात ठेवा की आरोग्याकडे दुर्लक्ष करणे नंतर जड जाऊ शकते. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. दुपारनंतर तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस आनंदी आणि शांततेचा जाईल. भावंडांच्या सहवासाचा लाभ होईल. आज मित्र आणि नातेवाईकांचीही भेट होईल. दुपारनंतर नकारात्मक विचार मनात एखाद्या गोष्टीची चिंता निर्माण करू शकतात. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही भावूक व्हाल. घरातील वातावरण उग्र राहील. आज कुटुंबात कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे. जमीन इत्यादी कामात निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते.

कर्क (Cancer Horoscope) : मन गोंधळलेले राहील, ज्यामुळे तुम्ही कोणतेही विशेष काम करण्यात निराश व्हाल. कुटुंबातील सदस्यांसोबत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुम्हाला नियुक्त केलेल्या कामात कमी यश मिळेल. दुपारनंतर तुमचा वेळ चांगला जाईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. भावा-बहिणींकडून लाभ मिळेल. एखाद्याशी भावनिक संबंध निर्माण होईल. मनातील चिंता दूर होतील.

सिंह (Leo Horoscope) : वर्तनात बदल आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला गोष्टी नीट समजावून सांगता येणार नाहीत.  आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. आज तुम्ही प्रत्येक काम दृढ निश्चयाने कराल. यामुळे तुम्हाला यश मिळेल. आज तुमच्यामध्ये रागाची भावना कमी असेल, त्यामुळे बहुतांश ठिकाणी मौन बाळगा. सरकारी कामात फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल.

कन्या (Virgo Horoscope) : आज तुमचे मन अधिक भावूक होईल. भावनिक होऊन कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. आज चर्चा आणि वादविवादापासून दूर राहा. कोणाशीही हिंसक वर्तन करू नका. दुपारनंतर तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तरीही रागावर संयम ठेवा. आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे आणि अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आज धनहानी होण्याची शक्यता आहे.

तूळ (Libra Horoscope) : व्यवहारात चिडचिडेपणा दिसून येईल. कोणाशीही वाद होऊ शकतो. अशा वेळी रागावर नियंत्रण न ठेवल्यास प्रकरण वाढू शकते. तुम्ही संयम दाखवलात तर बरे होईल.तुमची कठोर वृत्ती मित्रांना त्रास देऊ शकते. लाभाचा दिवस आहे. व्यवसायात नफा मिळेल. मुलांशी संबंध चांगले राहतील. दुपारनंतर मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त भावनिक होऊ नका. 

वृश्चिक (Scorpio Horoscope) : प्रत्येक काम दृढ मनोबल आणि आत्मविश्वासाने पूर्ण कराल. व्यवसायातही तुमच्या प्रतिभेचे कौतुक होईल. नोकरीत अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील. त्यामुळे प्रमोशन मिळू शकते. वडिलांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. त्यांचाही फायदा होईल. दुपारनंतर तुम्ही काही गोंधळात राहू शकता. मित्रांसोबत वेळ चांगला जाईल. आरोग्यकडे थोडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पैशाशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त राहू शकता.

धनु (Sagittarius Horoscope) : बिघडलेली कामेही सहज पूर्ण होतील. पैसे कुठे अडकले असतील, तर तेही सापडतील. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. जुन्या प्रकल्पांच्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल. चुकीच्या कामांपासून दूर राहा. रागावर नियंत्रण ठेवा. दुपारनंतर तुमचा दिवस खूप चांगला आणि यशस्वी जाईल. तुमचे काम सहज पूर्ण होईल. नोकरीत अधिकारी तुमची प्रशंसा करतील.

मकर (Capricorn Horoscope) : सावध राहा. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. नकारात्मक विचारांना तुमच्यावर प्रभाव पाडू देऊ नका. यामुळे तुमची अनेक कामे सहज पूर्ण होतील. आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार रहा. तथापि, दुपारनंतर स्थिती थोडी निवळलेली जाणवेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. स्वभावात राग आणि आक्रमकता राहील. वाणीवर संयम ठेवा.

कुंभ (Aquarius Horoscope) : व्यवसायात भागीदारांशी वाद होऊ शकतो. तुमचा दृष्टिकोन लादण्याऐवजी इतरांची मते ऐकण्याची सवय लावा. वैवाहिक जीवनात वैचारिक मतभेद होतील. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी चांगली राहील. घरातील वातावरण शांततापूर्ण राहील. दैनंदिन कामात काही अडथळे येऊ शकतात. नोकरदार लोकांचा ऑफिसमध्ये कोणाशी वाद होऊ शकतो. कठोर परिश्रम केले, तरी तुम्हाला योग्य फळ मिळणार नाही.

मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला रमल्यासारखे वाटणार नाही. व्यवसायात फारसा नफा मिळण्यास वाव राहणार नाही. आज कुटुंबात सामंजस्य राहील. दैनंदिन कामात विलंब होईल. कार्यालयात सहकाऱ्यांचे सहकार्य कमी राहील. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार नाही. तुमच्या कामाचे श्रेय दुसरे कोणी घेऊ शकते. मात्र, आजचा दिवस संयमाने घालवा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tractor Ran over Children : घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझाAnandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तकNitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखलेAkshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tractor Ran over Children : घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
Mallikarjun Kharge Video : स्टेजवर भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रकृती खालावली; म्हणाले, मी इतक्या लवकर मरणार नाही!
Video : स्टेजवर भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रकृती खालावली; म्हणाले, मी इतक्या लवकर मरणार नाही!
ह्रदयद्रावक... वीजेचा धक्का लागून 3 जणांचा मृत्यू; वडिलांना शोधण्यास गेलेल्या लेकाचाही अंत
ह्रदयद्रावक... वीजेचा धक्का लागून 3 जणांचा मृत्यू; वडिलांना शोधण्यास गेलेल्या लेकाचाही अंत
Sushma Andhare: महाविकास आघाडीच्या 20-22 जागांचा तिढा कायम, सुषमा अंधारेंनी सांगितला मविआचा विधानसभेचा फॉर्म्यूला..
महाविकास आघाडीच्या 20-22 जागांचा तिढा कायम, सुषमा अंधारेंनी सांगितला मविआचा विधानसभेचा फॉर्म्यूला..
Rohit Pawar : भावी मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगलेली असतानाच रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, जनतेचे प्रेम...
भावी मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगलेली असतानाच रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, जनतेचे प्रेम...
Embed widget