एक्स्प्लोर

Horoscope Today, July 26, 2022 : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, July 26,  2022 : मेष राशीच्या लोकांना नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. वृषभ राशीच्या लोकांच्या गोंधळलेल्या मानसिकतेमुळे महत्त्वाच्या संधी हातून जाऊ शकतात.   

Horoscope Today, July 26,  2022 : आज सूर्य कर्क राशीत आणि चंद्र मिथुन राशीत आहे. आद्रा नक्षत्र आहे. गुरु मीन राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. वृषभ राशीच्या लोकांच्या गोंधळलेल्या मानसिकतेमुळे महत्त्वाच्या संधी हातून जाऊ शकतात. वाचा सविस्तर राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज तुम्हाला नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. नवीन कामही सुरू करू शकता. सतत बदलत्या विचारांमुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात क्षेत्रात प्रतिस्पर्ध्यांच्या कठोर वागणुकीला सामोरे जावे लागेल. मित्रांच्या मदतीने व्यवसायात फायदा होईल. इतरांच्या भावनांची काळजी घ्या. संध्याकाळी जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा बेत आखू शकता.

वृषभ (Taurus Horoscope) : गोंधळलेल्या मानसिकतेमुळे महत्त्वाच्या संधी हातून जाऊ शकतात. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. इतरांच्या कामात अनावश्यक ढवळाढवळ केल्याने तुमची बदनामी होऊ शकते. हट्टी स्वभावामुळे मतभेद होऊ शकतात. घरामध्ये धार्मिक कार्य करता येईल. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आजचा बराचसा वेळ मनोरंजनात खर्च होईल.

मिथुन (Gemini Horoscope) : कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करता येईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. स्पर्धेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आजचा दिवस शुभ आहे. सावधगिरी बाळगा. गोपनीय गोष्टी शेअर करणे टाळा, अन्यथा तुमचा विश्वासघात होऊ शकतो. नातेवाईकांसोबत तुमचा दिवस आनंदात जाईल. वैवाहिक जीवनात समाधान आणि शांती मिळेल. आर्थिक लाभ आणि योजना पूर्ण होण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.

कर्क (Cancer Horoscope) : आज तुम्हाला काही सरप्राईज मिळू शकते. भावंडांच्या सहकार्याने व्यवसायात लाभ होईल. विद्यार्थ्यांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. घरात पाहुण्यांची ये-जा सुरु राहील. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. मानाने खंबीर राहा, अन्यथा आलेल्या संधी गमावू शकता. मित्रांची भेट लाभदायी ठरेल. वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. घरात शुभकार्याचे आयोजन केले जाईल.

सिंह (Leo Horoscope) : व्यवसाय करणाऱ्यांना काही चांगली माहिती मिळू शकते. एखादा करार काही काळ प्रलंबित असेल, तर तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरदार लोकांना आपला आळस झटकावा लागेल, तरच त्यांना कामात यश मिळेल. व्यवसायात चांगले यश मिळेल. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. प्रवासाचीही शक्यता आहे. नवीन नोकरी मिळू शकते. आज तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.

कन्या (Virgo Horoscope) : नवीन कामाची सुरुवात चांगल्या प्रकारे करू शकाल. व्यावसायिक आणि नोकरदार लोकांसाठीही येणारा काळ चांगला आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात लाभ आणि नोकरीत बढतीची शक्यता आहे. वडिलांकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या राशीच्या अविवाहितांसाठी चांगले स्थळे येऊ शकतात.

तूळ (Libra Horoscope) : व्यापार क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. लांबचा प्रवास किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात रस वाढेल. धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल. व्यवसायात सामान्य लाभ होईल. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. तुमचे कोणतेही सरकारी काम पुढे ढकलू नका, अन्यथा ते तुमच्यासाठी काही नवीन संकटे आणू शकतात.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : कामाचा ताण वाढल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकता. संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. नवीन कार्य सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. नवीन कामात अपयश येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणतेही नवीन काम सुरू करू नका. खर्च वाढल्याने आर्थिक संकटही निर्माण होऊ शकते.

धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. सामाजिक स्थितीत वाढ होईल. व्यवसायात गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ आहे. जोडीदारासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा बेत आखू शकता. दैनंदिन कामात हलगर्जीपणा करण्याची गरज नाही, अन्यथा तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिक प्रगतीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

मकर (Capricorn Horoscope) : आज तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे. घरामध्ये मंगल कार्याचे नियोजन करता येईल. व्यवसायाच्या प्रगतीसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर असेल. नवीन लोकांशी संपर्क होईल. पैशाच्या व्यवहारातही यश मिळेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुम्ही एखादे नवीन काम सुरू केले, तर त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना आज एखादे सरप्राईज मिळू शकते. व्यावसायिकांना आज चांगले पैसे मिळतील. घरी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य सहभागी होतील. एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्याने विचारपूर्वक गुंतवणूक करावी लागेल, अन्यथा तुमचा निर्णय चुकीचा ठरू शकतो.

मीन (Pisces Horoscope) : नोकरी किंवा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल आहे. घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेदही होऊ शकतात. वाद टाळण्यासाठी तुम्हाला शांत राहावे लागेल. नोकरीत समस्या निर्माण होऊ शकतात. आपले काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget