एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Horoscope Today, August 8, 2022 : श्रावणी सोमवारी ‘या’ राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 8, 2022 : मेष राशीचे लोक गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील, तर आजचा दिवस खूप शुभ आहे. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाच्या संधी मिळतील.

Horoscope Today, August 8, 2022 : आज चंद्र ज्येष्ठ नक्षत्रात असून, वृश्चिक राशीत आहे. दुपारनंतर तो धनु राशीत प्रवेश करेल. सूर्य कर्क राशीत आणि शनि मकर राशीत आहे. गुरू मीन राशीत आहे. मेष राशीचे लोक गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील, तर आजचा दिवस खूप शुभ आहे. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. वाचा संपूर्ण राशीभविष्य

मेष (Aries Horoscope) : हातातील कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. व्यवसायातही काळजी घ्या. नोकरदार लोकांचे अधिकारी त्यांच्यावर नाराज होतील. मुलांशी मतभेद होऊ शकतात. महत्त्वाचे निर्णय घेणे तूर्तास पुढे ढकला. कुटुंबातील सदस्यांशी वाद टाळण्यासाठी शक्यतो शांत राहा. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस यासाठी खूप शुभ आहे. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ (Taurus Horoscope) : आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असेल. भूतकाळात अडकलेली कामे निकाली लागतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. भागीदारी व्यवसायात आजचा दिवस महत्त्वाचा असेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. नोकरदार लोकांना काही नवीन काम मिळू शकते. व्यवसायासाठी आजचा दिवस सामान्य आहे. आज कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.

मिथुन (Gemini Horoscope) : शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. ऑफिसमध्ये सहकार्याचे वातावरण राहील. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा कार्यक्रम करू शकता. उच्च अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल आणि कामात त्याचा फायदा होईल. परदेशाशी संबंधित व्यवसायात अधिकच नफा मिळू शकतो. घरातील रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागेल. वाहन आणि घर खरेदीचा विचार करत असाल, तर त्यासाठीची योजना आखा.

कर्क (Cancer Horoscope) : नोकरदार लोकांनी आज ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या कामांवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. काही लोक बॉससमोर तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या कारस्थानांना योग्य उत्तर देण्याची तयारी ठेवा. आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला असेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. भागीदारी व्यवसायात आजचा दिवस महत्त्वाचा असेल, लाभाच्या संधी प्राप्त होतील.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात यश मिळेल, नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. कलात्मक क्षेत्राशी निगडित लोकांना नाव प्रसिद्धी मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या. आज कोणतीही व्यवसाय योजना पुढे ढकलणे योग्य नाही. हातातील कामे पूर्ण करा.

कन्या (Virgo Horoscope) : आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे. प्रिय व्यक्तींशी भेट होईल. विरोधकांवर विजय मिळवू शकाल. कोणत्याही प्रकारच्या सरकारी आणि कागदोपत्री कामात खूप काळजी घ्या. नोकरी व्यवसायात तुम्हाला मंदीचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे छोटीशी धनहानी होऊ शकते. रागाच्या अतिरेकीमुळे समाजातील तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.

तूळ (Libra Horoscope) : व्यावसायिकांची प्रगती होईल. आर्थिक लाभाच्या संधी चालून येतील. नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढू शकते, धनलाभ होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. अभ्यासासाठी दूरच्या ठिकाणी प्रवास करू शकता. परदेशात जाण्याचे योगही तयार होत आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकते. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आनंद आणि समाधान अनुभवाल. कुटुंबातील सदस्यांसोबत दिवस आनंदात जाईल. चांगली बातमी मिळेल. दुपारनंतर कुटुंबात वादाचे वातावरण निर्माण होऊ शकते. या काळात तुम्हाला शांत राहून वाद टाळावे लागतील. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहणार नाही. व्यवसायासाठी आजचा दिवस सामान्य आहे. अनावश्यक खर्चावर संयम ठेवा.

धनु (Sagittarius Horoscope) : आर्थिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. पण खर्चही वाढेल. कलाकार लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे.  धनलाभ होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांसाठी हा काळ शुभ आहे. पद प्रतिष्ठा वाढू शकते. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल. कामाच्या ठिकाणी व्याप वाढू शकतो. मात्र, लवकरच ही स्थिती सुधारेल.

मकर (Capricorn Horoscope) : कामातील निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवा. तो चोरीला जाण्याचा किंवा गहाळ होण्याचा धोका आहे. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक मंदी दूर होईल. लाभाच्या संधी चालून येतील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही पूर्ण उत्साहाने काम करण्यात व्यस्त असाल.

कुंभ (Aquarius Horoscope) : रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. अन्यथा केलेले काम खराब होईल. आळसही दूर करावा लागेल. मेहनतीने काम केल्यास प्रतिष्ठा वाढेल आणि अधिकच पैसा मिळण्याचीही शक्यता आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील. पदोन्नतीची शक्यता आहे. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रमही करता येईल. व्यवसायातही फायदा होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन ओळख निर्माण होईल. उच्च अधिकाऱ्यांकडूनकौतुक होईल. नोकरी-व्यवसायासाठी संपूर्ण दिवस चांगला सिद्ध होईल. लाभाच्या अनेक संधी येतील. नोकरीत बढती किंवा चांगल्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदे दरे गावात, महायुतीची बैठक कधी होणार?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Embed widget