एक्स्प्लोर

Horoscope Today, 8 July, 2022 : वृषभ, कर्कसह ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार मित्रांची भक्कम साथ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, 8 July, 2022 : आज चंद्र तूळ राशीत असून, चित्रा नक्षत्र आहे. सूर्य मिथुन राशीत, तर गुर मीन राशीत आहे. शनी कुंभ राशीत आहे.

Horoscope Today, 8 July, 2022 : आज चंद्र तूळ राशीत असून, चित्रा नक्षत्र आहे. सूर्य मिथुन राशीत, तर गुर मीन राशीत आहे. शनी कुंभ राशीत आहे. मेष राशीच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष आनंद देणारा असेल. वृषभ राशीच्या लोकांच्या कामाचे विशेष कौतुक केले जाईल. जाणून  घ्या आजचे संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष आनंद देणारा असेल. व्यवसायात लाभ होईल. जवळचा प्रवास करावा लागेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. लाभ मिळेल, परंतु अधिक मेहनतही घ्यावी लागेल. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फार चांगला जाणार आहे. राजकीय क्षेत्रात सक्रिय असणारे लोक आपल्या नव्या कामाला सुरुवात करू शकतात.

वृषभ (Taurus Horoscope) : आज वडिलधाऱ्यांकडून मोलाचा सल्ला मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे विशेष कौतुक केले जाईल. भागीदारीच्या व्यवसायात विशेष लक्ष द्यावे लागेल, तरच योग्य तो लाभ मिळेल. व्यापारांना आज भरगोस आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. मित्राची साथ लाभेल. एखाद्याला उधार दिलेले किंवा अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे.

मिथुन (Gemini Horoscope) : व्यवसायात नवीन संबंध प्रस्थापित होतील, ज्याचा भविष्यात फायदा होईल. नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल, तर काळजीपूर्वक निर्णय घ्या. मनाला आवडणारे काम करण्याचे संधी मिळेल. नव्या योजनांमध्ये अधिकाऱ्यांची मदत मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून अधिकची जबाबदारी तुमच्या खांद्यावर टाकली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना कठोर मेहनत करावी लागले.

कर्क (Cancer Horoscope) : कामाच्या ठिकाणी तुमच्या विचारांचा प्रभाव दिसेल. मात्र, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी आपल्या आजूबाजूच्या लोकापासून सावध राहावे. अर्धवट राहिलेली कामे आजच पूर्ण करा, अन्यथा नंतर त्याचा त्रास होऊ शकतो. पैसे जपून खर्च करा. आर्थिक समस्यांमुळे त्रस्त व्हाल. मित्रांची साथ मिळेल. संयम बाळगा. दूरच्या प्रवास घडण्याची शक्यता आहे. आपला पैसा कुठे कुठे अडकला आहे, याचा नीट विचार करा.

सिंह (Leo Horoscope) : कामासोबतच त्याच्या गुणवत्तेवर देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून आपल्या कुटुंबाला देण्याचा प्रयत्न करा. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नोकरीत बढती होऊन, नवीन पद मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही व्यवसायिक योजना आज टाळू नका. स्वतःच्या मर्जीने, अभ्यासपूर्वक एखाद्या ठिकाणी पैसा गुंतवा.

कन्या (Virgo Horoscope) : आज तुम्हाला तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात संयम बाळगावा लागेल. नोकरदार वर्गाचे अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. या वादाचा परिणाम तुमच्या कामावर आणि प्रमोशनवर देखील होऊ शकतो. मेहनत करा आणि नशिबावर विश्वास ठेवा. कुटुंबात मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. नोकरीत विशेष कौतुक होऊ शकते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. वडिलधाऱ्यांकडून आर्थिक लाभ होईल.

तूळ (Libra Horoscope) : आज तुमच्या व्यवसायात भरभराट होणार आहे. मात्र, अधिक मेहनतही करावी लागणार आहे. चिंता करू नका, यात तुम्हाला तुमच्या मित्रांची साथ लाभणार आहे. नकारात्मक विचारांचा प्रभाव दिसून येईल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. व्यवसाय विस्तारात अधिकच पैसा खर्च होऊ शकतो. नोकरदार वर्गाला आज प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही समस्या असल्यास घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : कोणतेही काम करताना त्याचे मुल्यांकनही करा. यामुळे तुम्हाला त्यातील त्रुटी काळातील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय लाभदायी असणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळणार आहे. कौटुंबिक कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करा. एखादी समस्या असल्यास, त्यावर मित्रांचा सल्ला घ्या. धार्मिक कार्यात रुची वाढेल. एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करा, ज्यामुळे मनाला आनंद मिळेल.

धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदमय असणार आहे. अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. याचा तुम्हाला प्रत्येक पावलावर फायदा होईल. प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणेही अतिशय महत्त्वाचे आहे. मालमत्तेशी संबंधित एखादे प्रकरण निकाली लागण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायातही नवीन संबंध प्रस्थापित होऊन, यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मसंयम बाळगा.

मकर (Capricorn Horoscope) : व्यवसायात एखादा निर्णय घेण्यापूर्वी द्विधा मनस्थिती असेल.घरातील रोजची कामे लवकर आवरल्याने तुम्हाला स्वतःसाठी मोकळा वेळ मिळेल. मुलांच्या बाबतीत एखादा निर्णय घेताना जोडीदाराचा विचार लक्षात घ्या. आज तुम्ही हातातील सगळी कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नोकरदार वर्गाने अधिकाऱ्यांशी संबंध चांगले ठेवावेत. अतिराग करणे टाळा. आज नोकरीत बदल होण्याची देखील शक्यता आहे.

कुंभ (Aquarius Horoscope) : मनातील नकारात्मक विचारांना दूर करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत एखादी नको असलेली जबाबदारी मिळू शकते. आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. घरात एखाद्या मनाला कार्याचे आयोजन केले जाऊ शकते. अनावश्यक वादविवाद टाळा. अधिकच पैसा खर्च होईल. त्यामुळे मन चिंतेत राहील. व्यवसायात काहीसा तोटा सहन करावा लागू शकतो. भविष्यासाठी काही योजना बनवणे लाभदायी ठरणार आहे.

मीन (Pisces Horoscope) : तुमची नेहमी एकत्र आणि मिळून मिसळून काम करण्याची कल्पना फायदेशीर असल्याचे सिद्ध होणार आहे. कुटुंबातील सलोखा टिकवून ठेवा. आरोग्यविषयक समस्या जाणवू शकतात. त्यामुळे तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. कोणतीही गोष्ट खरेदी करण्यापूर्वी त्याची नीट माहिती घ्या. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. सुरु असलेल्या व्यवसायात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज

व्हिडीओ

Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Solapur Crime: कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
Embed widget