(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : आज एकादशीच्या दिवशी बनला बुधादित्य योग; कुंभसह 'या' 5 राशींसाठी ठरणार फलदायी, सर्व अडचणी होणार दूर
Astrology 6 March 2024 : आज, म्हणजेच 6 मार्च रोजी बुधादित्य योग, रुचक योगासह अनेक फायदेशीर योगांची निर्मिती होत आहे, ज्यामुळे आजचा दिवस मेष, कन्या, धनु राशीसह इतर 5 राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. तसेच, बुधवारचा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे, त्यामुळे आज 5 राशींना बाप्पाचा आशीर्वाद देखील लाभेल. पण या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology 6 March 2024 : आज (बुधवार, 6 मार्च) चंद्र धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून ही तिथी विजया एकादशी म्हणून ओळखली जाते. आज विजया एकादशीच्या दिवशी बुधादित्य योग, रुचक योग आणि पूर्वाषाधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळणार आहे. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील. आज म्हणजेच 6 मार्च रोजी कोणत्या राशीचे लोक भाग्यवान ठरणार आहेत ते जाणून घेऊया. आज बनलेल्या शुभ योगांमुळे नेमक्या कोणत्या राशींना (Zodiac Signs) फायदा होणार? जाणून घ्या
मेष रास (Aries)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. मेष राशीचे लोक आज योग्य पद्धतीने पैशांची गुंतवणूक करतील. सासरच्या लोकांशी तुमचे चांगले संबंध राहतील. भावंडांकडून तुम्हाला मदत मिळेल. ऑनलाईन व्यावसाय करणाऱ्यांना आज मोठी ऑर्डर मिळू शकते. जे गुंतवणूक करतात त्यांना आज चांगला नफा मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुम्ही एकमेकांना सर्वतोपरी मदत कराल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. कन्या राशीचे लोक आज करिअरमध्ये मोठं यश मिळवू शकतात. नशिबाची साथ मिळाल्याने तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्ही काही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. कुटुंबातील एखादी व्यक्ती निवृ्त्त झाली असेल, तर तुम्ही त्यांच्यासाठी एक छोटी पार्टी आयोजित करू शकता. तुम्ही तुमचं कोणतंही प्रलंबित काम आज सहज पूर्ण करू शकाल. नोकरदारांना आज सहकाऱ्यांची मदत मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचं काम सहजपणे पूर्ण करू शकाल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. लव्ह लाईफसाठी आजचा दिवस चांगला असेल, तुम्ही प्रियकरासोबत भविष्याच्या योजना आखू शकता.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज वृश्चिक राशीच्या लोकांच्या सर्व समस्या बाप्पाच्या कृपेने दूर होतील, तुम्ही सरकारी योजनांचा पुरेपूर लाभ घेऊ शकाल. आज तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्ही तुमच्या घराचं काम करण्याचाही विचार करू शकता, ज्यामध्ये तुम्ही चांगलाच खर्च कराल. आज तुम्ही कौटुंबिक वाद मिटवाल आणि तुमच्या भावंडांच्या मदतीने घरातील कामं पूर्ण करू शकाल. आज व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे आणि ते इतर काही व्यवसायातही गुंतवणूक करू शकतात.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. बरेच दिवस अडकलेले पैसे आज तुम्हाला मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. अविवाहित लोक आज एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात, ज्यांना भेटून ते खूप आनंदी होतील. जर तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याला काही वचन दिलं असेल तर तुम्ही आज ते पूर्ण कराल, घरातील मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असतील तर ते आज बोलून सोडवता येतील. कोणत्याही कायदेशीर प्रकरणात तुम्हाला अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांची नवीन घर किंवा गाडी खरेदी करण्याची इच्छा आज पूर्ण होईल. तुम्ही धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचं कोणतंही प्रलंबित काम आज वेळेवर पूर्ण होईल. खूप दिवसांनी तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता, तुम्ही त्याला भेटून चांगल्या गप्पा माराल. व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असेल, कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काम करू शकाल. मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही काही पैसे वाचवू शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Vijaya Ekadashi 2024 : आज विजया एकादशी! मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या