Horoscope Today 29 March 2024 : धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
Horoscope Today 29 March 2024 : 12 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. परंतु काही राशींना आज काही समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. कुणासाठी आजचा दिवस शुभ किंवा कुणासाठी आजचा दिवस अशुभ ठरेल? सर्व राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
Horoscope Today 29 March 2024 : पंचांगानुसार, आज 29 मार्च 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आजच्या दिवशी काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा देखील येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या
मेष (Aries Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरीच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि प्रगती निश्चित आहे. नोकरीत बढतीची संधी मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
व्यवसाय (Business) - व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक मेहनत करण्याची गरज आहे, तरच तुम्हाला यश मिळेल.
कुटुंब (Family) - घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर कुटुंबातील लोक नाराज होतील.कुटुंबासह धार्मिक स्थळी जाण्याचा योग आहे
आरोग्य (Health) - बाहेरचे खाणे टाळा. पोटाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
वृषभ (Taurus Today Horoscope)
आर्थिक जीवन (Wealth) - आर्थिक जीवनात समृद्धी येईल. यासोबतच तुम्ही करमुक्तही होऊ शकता.
कुटुंब (Family) - नातेवाईक आणि मित्रांकडून अचानक भेटवस्तू मिळतील. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल घरातील कामे आटोपल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीची कामे करून तुमच्या मोकळ्या वेळेचा पुरेपूर वापर कराल.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थी परीक्षेत चांगले गुण मिळवतील, ज्यामुळे त्यांच्या पालकांचा सन्मान होईल. जे घरापासून दूर आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येऊ शकते.
आरोग्य (Health) - मुलाच्या किंवा वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतील. व्यस्त वेळापत्रक असूनही, तुमचे आरोग्य पूर्णपणे ठीक राहील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश कराल.
मिथुन (Gemini Today Horoscope)
आर्थिक जीवन (Wealth) - आईकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. घरबसल्या काम करणाऱ्या लोकांनाही चांगला फायदा मिळेल.
व्यवसाय (Business) - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यवहाराशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही जेवढे सावध रहाल तेवढे तुमच्यासाठी चांगले राहील.
लव्ह लाईफ (Love Life) - एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या नात्यात मतभेद होऊ शकतात.जारी, मित्र किंवा नातेवाईक यांच्यामुळे वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्यता आहे.
आरोग्य (Health) - दिवस तुमच्यासाठी आनंददायी जाणार आहे. विवाहित लोक त्यांच्या घरगुती जीवनात आनंदाने आणि शांततेने जगतील.
कर्क (Cancer Today Horoscope)
नोकरी (Job) -दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील.
व्यवसाय (Business) - रखडलेल्या व्यवसाय योजना पुन्हा सुरू करण्यात यशस्वी होतील. तुमचे अतिरिक्त पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा. जे तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल. तुमचा विनोदी स्वभाव तुमच्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न करेल.
लव्ह लाईफ (Love Life) - जोडीदारासोबत वेळ घालवाल. वेळ दिल्याने जोडीदर खूश होईल. प्रियकराला एक खास भेट देऊ शकतात.
आरोग्य (Health) - ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीबाबत दक्ष राहा. तब्येत ठीक वाटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
सिंह (Leo Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरीत बढती मिळेल. ध्यान आणि योगासने शारीरिक आणि मानसिक फायद्यासाठी उपयुक्त ठरतील. रात्री तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, कारण तुम्ही दिलेले पैसे उद्या तुम्हाला परत केले जाऊ शकतात.
व्यवसाय (Business) - व्यवसायात काही बदल करायचे आहेत त्यांच्यासाठी काळ चांगला आहे. वडील तुमच्या व्यवसायात काही पैसे खर्च करतील. व्यवसायाशी संबंधित प्रवासाची शक्यता आहे. जे प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.
लव्ह लाईफ (Love Life) - जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. जोडीदाराला घरकामात मदत करण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी (Student) - परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी मेहनत घेतील.
कन्या (Virgo Today Horoscope)
नोकरी (Job) - कामाच्या संदर्भात केलेले प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात कामाच्या ठिकाणी तुमचे काही नवीन मित्र बनतील.
विद्यार्थी (Student) - सरकारी परीक्षांमध्ये तुम्ही चांगलं यश मिळवू शकता. जर तुम्ही वेळेचं योग्य व्यवस्थापन केलं, तर परीक्षेची तयारी करणं सोपं जाईल आणि तुम्हाला तणाव जाणवणार नाही.
आरोग्य (Health) - निष्काळजीपणा आणि कामाच्या ताणामुळे आरोग्याशी संबंधित काही गंभीर समस्या उद्भवू शकतात.
तूळ (Libra Today Horoscope)
शिक्षण (Education) - शैक्षणिकदृष्ट्या तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
नोकरी (JOB) - नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामात यश मिळेल तसेच ज्यांना नोकरीची गरज आहे अशा तरूणांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात बरकत मिळेल. कामाच्या नवीन ऑर्डर्स येतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल.
आरोग्य (Health) - आज तुमचे आरोग्य चांगले असेल पण, जोडीदाराच्या तब्येतीची तुम्हाला सतत चिंता सतावेल. अशा वेळी वेळ न दवडता लगेच उपचार घ्या.
वृश्चिक (Scorpio Today Horoscope)
व्यवसाय (Business) - जे व्यावसायिक आहेत ते आपल्या व्यवसायात बदल करण्याचा प्रयत्न करतील. प्रगतीचे नवीन मार्ग शोधतील.
कुटुंब (Family) - तुमच्या कुटुंबियांबरोबर आजचा वेळ अगदी आनंदात जाईल. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता हे.
प्रेमसंबंध (Relationship) - आजचा दिवस तसा मोकळा असल्या कारणाने तुमच्या पार्टनरबरोबर छान संवाद साधता येईल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
आरोग्य (Health) - तुमचे आरोग्य अगदी ठणठणीत असेल. फक्त बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा.
धनु (Sagittarius Today Horoscope)
कुटुंब (Family) - जे विवाहित आहेत त्यांचे वैवाहिक जीवन आनंदात, सुख-शांतीत जाईल. नवीन आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी दोघेही तयार असाल.
नोकरी (Job) - नोकरदार वर्ग दिलेली कामे वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा, तुमच्या प्रमोशनवर प्रभाव पडू शकतो.
विद्यार्थी (Students) - विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने अभ्यासात मन गुंतवून ठेवणं गरजेचं आहे. भविष्यात परदेशी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आरोग्य (Health) - आज संध्याकाळी तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटू शकतं. अशा वेळी शतपाऊली करा.
मकर (Capricorn Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या नोकरदार वर्गाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे तरूणांनी ही संधी गमावू नका.
व्यवसाय (Buisness)- जे व्यावसायित आहेत त्यांनी बदलत्या काळानुसार आपल्या व्यवसायात बदल करणं गरजेचं आहे. अन्यथा, इतरांच्या तुलनेत स्पर्धेत मागे राहाल.
प्रेमसंबंध (Love) - तुमच्या नात्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. अशा वेळी संवाद साधून वाद मिटवा.
आरोग्य (Health) - तुम्हाला अनेक दिवसांपासून जो अस्वस्थपणा जाणवत होता तो हळूहळू कमी होईल. सकारात्मक विचार करण्यासाठी ध्यान करा.
कुंभ (Aquarius Today Horoscope)
व्यवसाय (Buisness) - जे छोटे व्यापारी आहेत त्यांच्या व्यवसायात प्रगती होण्याची चिन्हं आहेत. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल.
कुटुंब (Family) - कुटुंबातील आई-वडिलांच्या तब्येतीमुळे सतत चिंतेत असाल. पण, चिंता करण्याची गरज नाही. वेळेवर उपचार आणि औषधांनी तब्येतीत सुधारणा होईल.
शिक्षण (Education) - शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक कार्यक्रमात, स्पर्धेत भाग घेतल्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल. अभ्यासातही मन रमेल.
आरोग्य (Health) - आज तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल. अस्वस्थ वाटल्यास मित्र-मैत्रिणींशी संवाद साधा.
मीन (Pisces Today Horoscope)
नोकरी (Job) - तरूणांना नवीन नोकरी मिळाल्याने खूप आनंद होईल. कामातही प्रगती होत राहील. फक्त एकाग्रतेने काम करा.
प्रेमसंबंध (Relationship) - आजचा दिवस तुमच्या जोडीदाराबरोबर छान जाईल. नात्यातील जुन्या आठवणींना देऊन नातं खुलवण्याचा प्रयत्न करा.
आरोग्य (Health) - तुमचं मानसिक आरोग्य फार चांगलं आहे. संकटांना कसं सामोरं जायचं हे तुम्हाला माहीत असल्या कारणाने चिंता करण्याची गरज नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :