Horoscope Today 28 July 2025: आजचा पहिला श्रावणी सोमवार 'या' 6 राशी ठरणार भाग्यशाली! भोलेनाथांच्या कृपेने आयुष्य बदलणार, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 28 July 2025: आजचा पहिला श्रावणी सोमवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 28 July 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 28 जुलै 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. कारण आज श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण नुकताच श्रावण मासारंभ झाला आहे. आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज तुमचे विचार कितीही चांगले फायदेशीर असतील तरी तुम्हाला ते पटवून द्यावे लागतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमच्याच मताशी लोकांनी सहमत व्हावे ही भूमिका घ्याल. मानसिक अस्थिरता आणि चंचल स्वभावाला आळा घालावा लागेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांशी मतभेद होतील ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी पथ्य पाणी सांभाळावे.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज औषधोपचार वेळेवर घ्यावेत जोडीदाराच्या हुकूमशाही वृत्तीचा त्रास होईल त्यामुळे बंड करून उठाल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज व्यवहारात नक्की काय काय करावे याविषयी संभ्रमावस्था निर्माण होईल महिला कोणताही निर्णय पटकन घेऊ शकणार नाही
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज कर्तुत्वात बाजी मारून अंतर्मुख होऊन लोकांना आपल्याकडे आकर्षित कराल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या बुद्धीवादी लोकांना वेगवेगळ्या संधी मिळतील त्या क्षेत्रात काम करताना आनंद वाटेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात थोडा संघर्ष करावा लागेल जुनी येणी वसूल न झाल्यामुळे मानसिक त्रास होईल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध नको तिथे काम करावे लागेल कामगार वर्गाकडून म्हणावे असे सहकार्य मिळणार नाही
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो वैवाहिक जीवनात तडजोड जास्त करावी लागेल स्थावर इस्टेटिसंबंधीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणांमध्ये टोकाच्या वाद विवादापर्यंत जाऊ नये महिलांना जास्त कष्ट पडल्यामुळे प्रकृती बिघडण्याचा संभव आहे
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन केली तर त्यामध्ये फायदा होईल
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींचे भाग्य घेऊन येतायत! धनलक्ष्मी योगाने होणार चमत्कार, श्रीमंतीचे योग, साप्ताहिक भाग्यशाली राशी
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















