Horoscope Today 27 September 2024 : आज 3 राशींना लाभणार सूर्यदेवाची कृपा; मार्गातील अडचणी होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 27 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 27 September 2024 : पंचांगानुसार, आज 27 सप्टेंबर 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
व्यवसायात कामाला गती मिळाली तरी काही अडचणींमुळे त्याला खीळ बसेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
बुद्धीच्या जोरावर कामातील खाचाखोचा समजल्यामुळे कामे मार्गी लागतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आज काळजी करू नका नाहीतर तुमची आजच्या दिवसाची ताकद कमी होईल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
अति कर्तव्यनिष्ठतेमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo Horoscope Today)
थोडी संघर्षात्मक, विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कोर्ट कचेऱ्या ज्यांच्या मागे आहेत त्यांना समाधानकारक परिणाम अनुभवास न आल्यामुळे वैतागून जाल.
तुळ रास (Libra Horoscope Today)
दीर्घकालीन रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्यामुळे थोडे ताण निर्माण होतील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. बौद्धिक कसरती पेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या त्या यश मिळू शकेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
थोडा एकल कुंड्या कुढ्या स्वभावामुळे मनावरचा ताण अजून वाढवून घ्याल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
महिला थोड्या चिडखोर अस्थिर बनतील. आर्थिक अडचणी जाणवतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
घरात आणि घराबाहेर आपली भूमिका नेमकी ओळखून कर्तव्याचे पालन केले तर सारं सुसह्य होईल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: