एक्स्प्लोर

Horoscope Today 24 May 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? तुमचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 24 May 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 24 May 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Today Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष असेल. आज तुमचं एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होऊ शकतं, जे तुम्ही बऱ्याच काळापासून पुढे ढकलत होतात. आज तुम्ही तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण केली पाहिजे. तुमच्या मुलाला बाहेरून नोकरीची ऑफर मिळाल्याने कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. कोणाकडेही तुम्ही आज मदत मागितली तर ती सहज मिळेल. तुम्ही तुमच्या व्यवसायातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा, हे तुमच्यासाठी चांगलं राहील, तरच तुम्हाला योजनांचा चांगला लाभ मिळेल.

वृषभ(Taurus Today Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा असेल. आज तुमचं उत्पन्न वाढवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल. तुम्ही एखाद्याकडून पैसे घेतले असल्यास, ते तुम्हाला परत मागू शकतात. आज तुम्ही तुमचं सर्व काम सुरळीतपणे पार पाडलं तरच ते पूर्ण होताना दिसतील. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचं कोणतंही प्रलंबित काम पूर्ण होईल. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअरशी संबंधित कोणत्याही गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवू शकता.

मिथुन (Gemini Today Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. तुम्हाला कोणतेही जुने व्यवहार निकाली काढावे लागतील. प्रॉपर्टी डीलिंग करणाऱ्या लोकांनी पार्टनरशिपमध्ये कोणताही करार केला नाही तर त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. तुमच्या वडिलांच्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटेल, परंतु तरीही तुम्ही त्यांना काहीही बोलणार नाही. ज्यांना नोकरीची चिंता आहे ते इतरत्र अर्ज करू शकतात. तुम्ही एखाद्या ठिकाणी पार्ट टाईम जॉब करायचा विचार देखील करू शकता.

कर्क (Cancer Today Horoscope) 

आजचा दिवस तुमच्या सन्मानात वाढ करणारा आहे. जे लोक सामाजिक क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांना आपल्या कामात सावध राहावं लागेल आणि त्यांनी आपली कामं इतर कोणावरही सोपवू नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासात दिरंगाई केल्यास त्याचे परिणाम त्यांना नंतर भोगावे लागतील, कारण त्याचा परिणाम त्यांच्या परीक्षेवर होईल. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या मनमानी वागणुकीमुळे तुम्ही त्रस्त राहाल. मातृपक्षातील लोकांकडून आर्थिक लाभ होताना दिसतो. कोणताही आजार तुम्हाला दीर्घकाळ त्रास देत असेल तर तुमचा त्रास आज कमी होऊ शकतो.

सिंह (Leo Today Horoscope) 

नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुमचं कोणतेही काम करताना तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल, तरच ते पूर्ण होईल. जर तुम्ही भागीदारीत कोणतंही काम करत असाल, तर तुमच्या भागीदारासोबत बोलून पुढे गेल्यास ते तुमच्यासाठी फायद्याचं होईल. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं, अन्यथा चुका होऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबतीत वडिलांशी सल्लामसलत करून निर्णय घेणं चांगलं राहील.

कन्या (Virgo Today Horoscope) 

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मदत करण्याची संधी मिळाली तर नक्कीच करा, ज्यामुळे तुमच्या सेवाकार्यात वाढ होईल. तुम्ही काही धार्मिक कार्यक्रमाचा भाग होऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पैशाचा काही भाग देखील गुंतवाल. तुमच्या वरिष्ठ सदस्यांनी काही सल्ला दिल्यास, तुम्ही त्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे. तुमच्या कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल, ज्याचं निराकरण करण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आई तुमच्याकडून काहीतरी मागू शकते, तिची मागणी तुम्ही पूर्ण केलीच पाहिजे.

तूळ (Libra Today Horoscope) 

आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणींनी भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याकडून काही निराशाजनक माहिती ऐकू येईल. आज तुम्हाला वाहनं जपून वापरावी लागतील, अन्यथा त्यात काही बिघाड होऊ शकतो. सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या भावनांचा आदर करावा लागेल आणि कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. तुमच्या वडिलांना डोळ्याशी संबंधित समस्या असल्याने तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी कमकुवत असणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरुक राहावं लागेल. तुम्ही तुमच्या घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी करू शकता. आज तुम्हाला काही शत्रूंपासून सावध राहावं लागेल. तुमचा एखादा मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊ शकतो. तुम्ही तुमच्या घरात काही बदल कराल, ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल, जे लोक परदेशातून व्यवसाय करतात त्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जोडीदारासोबतच्या नात्यात काही मतभेद असतील तर तेही दूर होईल.

धनु (Sagittarius Today Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याचा दिवस असेल, परंतु कुणालाही असं काही बोलू नका, ज्यामुळे भांडण होऊ शकतं. कुटुंबातील लोकांना एकत्र ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमची काही कामं आज अपूर्ण राहू शकतात, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील. खूप दिवसांनी जुन्या मित्राला भेटून तुम्हाला आनंद होईल. तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या चर्चेत सहभागी झालात तर तुमची मतं लोकांसमोर जरूर मांडा, तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल.

मकर (Capricorn Today Horoscope)

आजचा दिवस तुमच्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस असेल. तुमचा एखादा मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येऊ शकतो. आज तुम्ही तुमची दिनचर्या सुधारू शकाल. इतरांकडून सन्मान मिळाल्यास मन प्रसन्न होईल. यासोबतच धार्मिक कार्यातही तुमची ओढ असेल, ज्यामुळे तुमच्या मनात स्वावलंबी होण्याची भावना कायम राहील. आज लव्ह लाईफमधील लोकांचे बंध अधिक घट्ट होतील, ज्यामुळे तुमच्या नात्यातील अंतर देखील संपेल. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी कठोर आणि परिश्रमपूर्वक काम करण्याचा दिवस असेल. तुम्ही तुमच्या मेहनतीत कोणतीही कसर सोडणार नाही. ऑफिसमध्ये तुमचे सहकारी तुमच्या कामात तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील आणि तुमच्या कामावर खूश झाल्यानंतर तुमचा बॉस तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकेल. तुम्हाला एका ठिकाणाहून दुसरीकडे जावं लागेल. बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक काही योजनेत चांगले पैसे गुंतवतील, ज्यामुळे त्यांना भविष्यात चांगले फायदे मिळतील. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीबद्दल तुम्ही चिंतेत असाल. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल.

मीन (Pisces Today Horoscope)

आज तुम्ही तुमच्या मुलांच्या काही वाईट सवयींमुळे चिंतेत असाल, ज्यामुळे तुम्हाला त्यांची निंदा करावी लागेल. तुम्ही कोणत्याही योजनेबाबत काही महत्त्वाची पावलं उचलू शकता. जर तुम्ही भागीदारीत कोणतंही काम सुरू केलं असेल, तर त्यामध्ये तुमच्या व्यावसायिक भागीदाराच्या कृत्यांवर लक्ष ठेवा. नवीन घर, दुकान इ. खरेदी करणं तुमच्यासाठी चांगलं असेल, परंतु काही नवीन लोकांसोबत मैत्री करताना तुम्ही खूप विचारपूर्वक वागलं पाहिजे, कारण त्यांच्यापैकी काही तुमचे विरोधक असू शकतात. राजकारणात काम करणाऱ्यांनी आपल्या महिला मैत्रिणींपासून सावध राहावं, अन्यथा त्यांचा विश्वासघात होऊ शकतो. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी कामात सुधारणा करावी लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Rajyog : 1 जूनला बनतोय शक्तिशाली राजयोग; मेषसह 'या' 3 राशीचे लोक रातोरात श्रीमंत होणार, भौतिक सुख वाढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget