Horoscope Today 22 October 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीसाठी कसा असणार आजचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य सविस्तर
Horoscope Today 22 October 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीचा आजचा दिवस कसा जाईल? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
Horoscope Today 22 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
कर्क (Cancer Today Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधतेचा राहील. वाहने जपून वापरावी लागतील. काही अपघात होण्याची शक्यता आहे. तुमची कोणतीही आवडती वस्तू हरवली असल्यास, तुम्हाला ती आज परत मिळेल. तुम्हाला तुमच्या आईकडून आदर मिळेल. जे अविवाहित आहेत ते त्यांच्या जोडीदाराला भेटू शकतात आणि तुम्हाला ऑफिसमध्ये चांगल्या कामासाठी बक्षीस मिळू शकतं. तुम्ही विचित्र कामांमध्ये अडकू नका आणि अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने नुकसान होईल.
सिंह (Leo Today Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समस्यांपासून सुटका देणारा असेल. काही नवीन कामात तुमची आवड निर्माण होऊ शकते. कोणत्याही कामात विचार न करता उडी मारू नका. जर तुम्ही तुमच्या आईची गोष्ट कुणाला सांगितली तर तो त्याचा फायदा घेऊ शकतो, त्यामुळे तुम्ही घरी राहूनच तुमच्या कौटुंबिक समस्या सोडवल्या तर बरं होईल. तुम्हाला धार्मिक कार्यात खूप रस असेल आणि तुम्ही तुमच्या पैशातील काही भाग धार्मिक कार्यातही गुंतवाल.
कन्या (Virgo Today Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. वडिलांच्या प्रकृतीकडे पूर्ण लक्ष द्यावं लागेल. जर तुमच्या मित्रांपैकी कोणी तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणुकीशी संबंधित कोणतीही योजना सुचवत असेल तर तुम्ही त्यात अजिबात गुंतवणूक करू नये. तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. विद्यार्थ्यांना काही प्रमाणात शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे. एखाद्याच्या सल्ल्याने तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काही चुकीचं करू शकता, त्यामुळे तुमचे कोणतेही काम दुसऱ्याच्या हातात सोडू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :