Horoscope Today 22 August 2025: आज श्रावणातील शेवटचा दिवस 'या' 4 राशींसाठी भाग्यशाली! पोळ्याचा सण कसा जाणार? आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 22 August 2025: आजचा शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 22 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 22 ऑगस्ट 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आज श्रावणातील शेवटचा दिवस आणि बैलपोळ्याचा सण असल्याने आजचा दिवस खास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज कोणत्याही गोष्टी मंद गतीने होत असल्या तरी यश मिळणार हे निश्चित, नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज कष्ट करण्याची जबरदस्त तयारी दाखवाल, राजकारणामध्ये आपला ठसा उमटवाल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला कामाचे आयोजन नियोजन चांगल्या रीतीने करतील, व्यवसायात स्थैर्य लाभेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज जरा जास्तच भावना विवश व्हाल, पण त्याचबरोबर थोडा हट्टीपणा आणि रागीटपणा सोडावा लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज दुसऱ्याच्या मताशी सहमत न झाल्यामुळे जरा त्रासिकपणा वाढेल, उद्योग व्यवसायात कामाची मांडणी करताना अस्थैर्य जाणवेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज व्यापारी वर्गाचे इरादे बुलंद असतील, पण त्यातील यश कामगारांकडून मिळणाऱ्या सहकार्यावर अवलंबून असल्यामुळे त्यांना खुश ठेवावे लागेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज आपली काही कामे विश्वासू माणसांवर सोपवा, तुमच्या अभ्यासू आणि चौकस वृत्तीमुळे परिस्थितीचा आढावा खूप चांगल्या पद्धतीने घ्याल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज एखादा छंद जोपासाल, इतरांच्या बुद्धीला न पटणाऱ्या नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्या हातून घडतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज महिलांचा आत्मविश्वास वाढेल, कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून चांगली होत असल्यामुळे अनेक जणांचे सल्लागार बनाल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्याशिवाय इतरांचे पान हलणार नाही, कलाकारांची कला वाढीस लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज लोक तुमच्या कामाला दाद देतील, नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा कराल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज यशाचे माप लगेच पदरात पडेल, अशी अपेक्षा करणं चुकीचे ठरेल, तरुण विद्यार्थी वर्गाला प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल.
हेही वाचा :
Hartalika 2025: महिलांनो.. हरतालिका तृतीयेला 'या' रंगाची साडी नेसाच, सौभाग्याला धक्काही लागणार नाही! पैसा, संपत्ती, अखंड सौभाग्य मिळवाल
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















