Horoscope Today 21 October 2025: आज लक्ष्मीपूजनाचा दिवस 'या' 7 राशींसाठी भाग्याचा! सुख-समृद्धी घरात नांदणार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 21 October 2025: आज लक्ष्मीपूजन आणि मंगळवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 21 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 21 ऑक्टोबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. आज नरक चतुर्दशी आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज पैशाची आवक वाढेल, त्यामुळे खरेदीचे बेत आखाल, घरातील व्यक्ती तुमच्यावर खुश होतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रसिद्धी माध्यमांच्या दृष्टिक्षेपात याल, कामाचा ताणही थोडा जाणवेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला आपल्या व्यासंगात रमतील वृत्तीने बिनधास्त राहाल, कोणाची पर्वा करणार नाही
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज तुमच्या स्वभावाचे फायदे तोटे आज तुम्हाला सहन करावे लागतील, महिलांना स्वतःकडे लक्ष देता येणार नाही
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज घरातील लोकांचा तुमच्या कोणत्याही निर्णयावर असणारा विरोध तुमच्या बाबतीत ताण निर्माण करेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आर्थिक धाडस करायला जाल, परंतु अंथरूण पाहून पाय पसरा
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज तरुणांनी मोठ्या व्यक्तींचा अपमान करू नये, सभोवतालच्या वातावरणाचा विचार करावा लागेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जे होते ते चांगल्यासाठी याचा विचार करून गप्प बसावे लागेल, नोकरीमध्ये तुमचा अधिकार गाजवण्याची गरज भासेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज कलाकार खेळाडूंना आपले प्राविण्य सिद्ध करण्याची गरज भासेल, व्यवसाय धंद्यातील कायद्यांचे काटेकोर पालन करावे
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज कारखानदारांना कामाची नवीन कार्यपद्धती अवलंबावी लागेल, आर्थिक स्वातंत्र्य मिळेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कोणत्याही संघर्षमय वातावरणात खेळी कशी करायची, याला तुम्ही सरावलेले राहाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये सर्वांच्या गरजा पुरवण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करताना थोडा ताण जाणवेल
हेही वाचा>>
Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजनच्या दिवशी 'या' रंगाचे कपडे घालताना सावधान! देवी लक्ष्मीचा कोप, वाईट शक्ती येण्यापूर्वी सतर्क राहा, शास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















