Horoscope Today 20 October 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीवर आज कामाचा ताण, आरोग्याची घ्या काळजी; वाचा रविवारचे राशीभविष्य
Horoscope Today 20 October 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
Horoscope Today 20 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
कर्क (Cancer Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला आज बोनसबद्दल किंवा एखादी चांगली बातमी मिळेल.
व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, सणासुदीचा काळ असल्याने उत्पादनांची चांगली विक्री होईल.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, परीक्षेच्या तोंडावर तुम्ही आज चांगला अभ्यास कराल.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्हाला तब्येतीत काही चढउतार जाणवू शकतात. डॉक्टरांकडून स्वतःवर योग्य उपचार करुन घ्या.
सिंह (Leo Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुम्हाला काही समस्यांनी घेरलं जाऊ शकतं. सुट्टीच्या दिवशी घरुन काम करावं लागू शकतं.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांनी काम करताना त्यांच्या ग्राहकांकडून त्यांच्या सेवेचा फीडबॅक घेतला पाहिजे आणि पुढे त्यानुसार बदल केले पाहिजे.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी नको त्या गोष्टीत आपला वेळ घालवू नये.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. टेन्शन फ्री होण्यासाठी मॉर्निंग वॉक, योगा करू शकता.
कन्या (Virgo Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, नोकरदार वर्ग आज खरेदीमध्ये रममाण होईल आणि आजचा दिवस खर्चिक असेल.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांनी आज जपून राहावं, तुमची फसवणूक होऊ शकते.
विद्यार्थी (Student) - तरुणांचा दिवस घरात एखाद्या कामात मदत करण्यात जाईल. कितीही अभ्यास असेल तरी काम करावंच लागेल.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :