Horoscope Today 2 August 2025: आजचा शनिवार 'या' 4 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवांचा भक्कम पाठिंबा, नशीबाची साथ, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 2 August 2025: आजचा शनिवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 2 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 2 ऑगस्ट 2025, आजचा वार शनिवार आहे. आज ऑगस्ट महिन्याचा दुसरा दिवस आहे, हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज अचानक प्रवासाचे योग येतील, घराबाहेर राहण्याचे प्रसंग आल्यामुळे घरातील व्यक्तींबरोबर खटके उडण्याची शक्यता.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज जोडीदाराच्या लहरी स्वभावाचा थोडा त्रास होईल. अशावेळी समजुतीचे धोरण स्वीकारावे लागेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिलांना स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याची संधी मिळेल, तुमच्या अतिचिकित्सक वृत्तीमुळे फायदे-तोटे सहन करावे लागतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो कोणत्याही वादाचा सुवर्णमध्य काढण्याचे धोरण अवलंबले तर फायद्याचे ठरेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज ग्रहांची साथ लागल्यामुळे आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न रंगवाल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज आर्थिक घडी चांगली बसेल, त्यामुळे थोडे हलकंही वाटेल, तरुणांचे विवाह ठरतील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज नवीन घर खरेदीचे बेत आखाल, घरामध्ये एकमेकांच्या मनामध्ये सुसंगतता राहिल्यामुळे शांती लाभेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जवळच्या व्यक्तींवर जबाबदारी टाकायला हरकत नाही. नोकरीमध्ये ज्यादा सवलत मिळावी. म्हणून प्रयत्न चालू करा
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज महिलांना करिअरमध्ये संधी मिळेल. कलाकार लोकांना मानसन्मान मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल. एकाग्रता वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज शिक्षण घेतानाच नोकरीच्या संधी हवे असतील तर. प्रयत्न करायला हरकत नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज आनंदी स्वभावामुळे इतरांना आपलेसे कराल वाहने जपून चालवा.
हेही वाचा :
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्टचा पहिला आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















