Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्टचा पहिला आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope 4 To 10 August 2025: ऑगस्टचा पहिला आठवडा तूळ ते मीन राशीसाठी कसा राहील? यासाठी नवीन आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 4 To 10 August 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याचा पहिलाचा आठवडा 4 ते 10 ऑगस्ट लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा खास असणार आहे. कारण श्रावण मासारंभाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान अनेक सण उत्सव साजरे केले जातील. तसेच, या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे. त्यामुळे नवीन आठवडा तूळ ते मीन राशीसाठी कसा राहील? ऑगस्टच्या या नवीन आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम आहे, खर्चावर नियंत्रण ठेवा. तसंच दुसरीकडे हा आठवडा संतुलन राखण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय राखणे फायदेशीर ठरेल. तुमच्या सर्जनशीलतेने आणि सौम्यतेने कठीण कामेही सोपी करता येतील. भागीदारीशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. घरातील ज्येष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या शहाणपणाने गुंतागुंतीच्या समस्या सोडवता येतील. अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही प्रलंबित पैसे मिळू शकतात, हा आठवडा दृढनिश्चय आणि उर्जेने भरलेला असेल. ज्यामुळे बोलण्यात कटुता टाळा, म्हणजे कामे सोपी होतील.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी या आठवड्यात आर्थिक परिस्थिती सुधारेल. हा आठवडा उत्साह, प्रवास आणि नवीन शक्यतांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी एखादा नवीन प्रकल्प किंवा संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. उच्च अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होऊ शकतात. . तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी जबाबदाऱ्या आणि संयमाची परीक्षा घेऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु शेवटी निकाल तुमच्या बाजूनेच येतील. उच्च अधिकाऱ्यांशी मतभेदाची परिस्थिती निर्माण करू नका, संयम ठेवा. नवीन योजना पुढे ढकलणे योग्य ठरेल. आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वक पावले उचला, अनावश्यक खर्च टाळणे महत्वाचे आहे. सावधगिरी बाळगा.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन विचारसरणी आणि सामाजिक सक्रियतेचे प्रतीक असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि योजनांचे कौतुक केले जाईल. तुम्हाला जुन्या सहकाऱ्याकडून पाठिंबा मिळू शकेल. तंत्रज्ञान किंवा ऑनलाइन माध्यमातून नफा मिळण्याची शक्यता असेल. आर्थिक स्थिती सुधारेल, अडकलेले पैसे मिळू शकतील.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सर्जनशीलता, भावना आणि आध्यात्मिक प्रवृत्तीने परिपूर्ण असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक केले जाईल आणि सहकारी सहकार्य करतील. अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती सामान्य राहील, परंतु घरगुती खर्च वाढू शकतो. एखाद्या खास व्यक्तीशी जवळीक वाढू शकते.
हेही वाचा :
Lucky Zodiac Signs: आजपासून ऑगस्टची जबरदस्त सुरूवात, 'या' 4 राशींचं नशीब पालटण्याची हीच ती वेळ, धन योगामुळे संपत्तीत होईल भरभराट
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















