एक्स्प्लोर

Horoscope Today 19 June 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? तुमचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 19 June 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 19 June 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. 

मेष रास (Aries Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुम्ही कामाच्या ठिकाणी पूर्णपणे सक्रिय होऊन काम कराल. तुमच्या कामाप्रती असलेल्या उत्साहाला पाहून तुमचा बॉस तुमच्यावर खुश होईल.

व्यापार (Business) - आज तुमच्या कामाचा तुम्ही जास्त प्रचार करायला हवा. तरच, तुमचा व्यवसाय जोमाने पुढे नेता येईल. 

तरूण (Youth) - जे तरूण युवक आहेत ते आपलं कार्य पुढे नेण्यासाठी सक्षम असतील. तरच, तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती करू शकता. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या शरीरात लोहाची कमतरता भासू शकते. यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

नोकरी (Job) - आजच्या दिवशी असं कोणतंच काम करू नका ज्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. 

व्यापार (Business) - आज तुमची रखडलेली जी काही कामं असतील तर ती वेळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

तरूण (Youth) - आज तुमचे भरपूर पैसे खर्च होऊ शकतात. तुमच्या पार्टनरवर तुम्ही जास्त पैसे खर्च करू शकता. यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. यासाठी बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी फार आळस आणि थकवा येऊ शकतो. यामुळे तुमची कामं कदाचित पूर्ण होणार नाहीत. 

व्यापार (Business) - आज व्यापाराच्या ठिकाणी कोणाबरोबरच उधारीचा व्यवहार करू नका. तुमचे पैसे काढून घेण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल.

तरूण (Youth) - आज भावा-बहिणीबरोबर तुमचे चांगले सलोख्याचे संबंध राहतील. यावेळी चुकूनही चिडचिड करू नका.

आरोग्य (Health) - आज तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असू शकता. सर्दी, खोकला, ताप येण्याची शक्यता आहे. 

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - सरकारी खात्याशी संबंधित आहेत किंवा कोणत्याही सरकारी पदावर काम करतात, त्यांना बदलीचे पत्र मिळू शकते, ज्यामध्ये त्यांना त्यांचे इच्छित स्थानही मिळू शकते. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी त्यांच्या ग्रहांचा विचार करून जमिनीत गुंतवणूक करावी, त्यांना त्यात मोठा नफा मिळू शकतो. जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, जर तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकत नसाल तर तुम्ही छोटी गुंतवणूक करू शकता.

तरुण (Youth) -  तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाइकांशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळे तुमचे नाते अधिक चांगले होईल

आरोग्य (Health) - पाठदुखी तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. यामुळे तुम्हाला नियमितपणे योगा करावा लागू शकतो

सिंह रास (Leo Today Horoscope)

नोकरी (Job) -  तुम्ही तुमची जबाबदारी चोख पार पाडत असताना तुमचा कार्यालयीन डेटा सुरक्षित ठेवावा. तुमच्याकडून महत्त्वाच्या गोष्टी गहाळ होण्याची शक्यता आहे.  

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. त्यांना जास्त नफा मिळेल आणि तोटा नाही. तुमचा दिवस चांगला जाईल. 

तरुण (Youth) -  क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला दान केले पाहिजे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही त्यांना काही धान्य दान देखील करू शकता. तुमच्या विनाकारण बोलण्याने तुमच्या घरातील वातावरण बिघडू शकते 

आरोग्य (Health) -   त्वचेच्या आजारांचा त्रास होऊ शकतो, म्हणूनच कोणत्याही प्रकारचे कॉस्मेटिक वापरण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. 

कन्या (Virgo Today Horoscope)

नोकरी (Job) -  प्रामाणिकपणे काम करा. कामात हलगर्जीपणा करु नका.

व्यवसाय (Business) - पूर्वनियोजित योजना अंमलात आणू शकता. जे तुमच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

तरुण (Youth) -  तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात, त्यांचा सल्लाही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 

आरोग्य (Health) - आवश्यकतेपेक्षा जास्त मेहनत करणे देखील तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही, तुमचे आरोग्य बिघडू शकते. 

तूळ रास (Libra Today Horoscope)

नोकरी (JOB) - नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामात यश मिळेल तसेच ज्यांना नोकरीची गरज आहे अशा तरूणांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात बरकत मिळेल. कामाच्या नवीन ऑर्डर्स येतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. 

आरोग्य (Health) - आज तुमचे आरोग्य चांगले असेल पण, जोडीदाराच्या तब्येतीची तुम्हाला सतत चिंता सतावेल. अशा वेळी वेळ न दवडता लगेच उपचार घ्या. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

व्यवसाय (Business) - जे व्यावसायिक आहेत ते आपल्या व्यवसायात बदल करण्याचा प्रयत्न करतील. प्रगतीचे नवीन मार्ग शोधतील. 

कुटुंब (Family) - तुमच्या कुटुंबियांबरोबर आजचा वेळ अगदी आनंदात जाईल. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता हे. 

प्रेमसंबंध (Relationship) - आजचा दिवस तसा मोकळा असल्या कारणाने तुमच्या पार्टनरबरोबर छान संवाद साधता येईल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. 

आरोग्य (Health) - तुमचे आरोग्य अगदी ठणठणीत असेल. फक्त बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा. 

धनु (Sagittarius Today Horoscope)

कुटुंब (Family) - जे विवाहित आहेत त्यांचे वैवाहिक जीवन आनंदात, सुख-शांतीत जाईल. नवीन आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी दोघेही तयार असाल. 

नोकरी (Job) - नोकरदार वर्ग दिलेली कामे वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा, तुमच्या प्रमोशनवर प्रभाव पडू शकतो. 

विद्यार्थी (Students) - विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने अभ्यासात मन गुंतवून ठेवणं गरजेचं आहे. भविष्यात परदेशी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

आरोग्य (Health) - आज संध्याकाळी तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटू शकतं. अशा वेळी शतपाऊली करा. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - जे लोक पेशाने डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. ऑपरेशन करताना काळजी घ्या. 

आरोग्य (Health) - बदलत्या वातावरणामुळे तुम्हाला घसादुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तेलकट, तिखट पदार्थांचं सेवन करू नका. आणि थंड पाणी पिऊ नका. 

व्यवसाय (Business) - जे छोटे व्यावहारिक आहेत त्यांना आज व्यवसायात चांगली ऑर्डर मिळू शकते. त्यामुळे काम करायला देखील उत्साह येईल. 

विद्यार्थी (Students) - आज विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल.प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्ही तुमच्या करिअरला घेऊन थोडे गंभीर असाल. कारण वाढत्या स्पर्धेमुळे तुम्हाला तणाव होऊ शकतो. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला पोटाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे पौष्टीक पदार्थांचं सेवन करा. 

व्यवसाय (Business) - ज्या ठिकाणी कोर्ट कचेरी असतील अशा व्यवसायात अडकू नका,नंतर प्रकरण तुमच्या गळ्याशी येऊ शकतं. 

युवक (Youth) - आज तरूणांनी प्रेमसंबंध सोडून इतर बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त तणावाचा सामना करावा लागेल. अनेक दिवसांपासून तुमचं रखडलेलं काम आजही पूर्ण होईल की नाही यात शंकाच आहे. 

आरोग्य (Health) - जर तुम्हाला मद्यपान, सिगारेटचं व्यसन असेल तर ते लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमची तब्येत बिघडू शकते. 

व्यवसाय (Business) - व्यवसायात तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुमच्या कामाच्या स्वरूपात थोडाफार बदल करणं गरजेचं आहे. 

युवक (Youth) - आज तुमचा आत्मसन्मान दुखावू शकतो. त्यामुळे इतरांचं बोलणं मनावर घेऊ नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Horoscope Today 19 June 2024 : आज 'या' राशींना मिळणार धनलाभाच्या संधी; तर 'या' राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध, वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
Nepal Protest : नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
Supreme Court : आम्हाला आमच्या संविधानाचा अभिमान, शेजारच्या देशात काय होतंय पाहा, सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान नेमकं काय म्हटलं?
आम्हाला आपल्या संविधानाचा अभिमान, शेजारच्या देशात काय होतंय पाहा : सुप्रीम कोर्ट
Chandrashekhar Bawankule : ओबीसींवर अन्याय होणार नाही, खोट्या नोंदी नकोच; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
ओबीसींवर अन्याय होणार नाही, खोट्या नोंदी नकोच; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
Nepal Protest : नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
Supreme Court : आम्हाला आमच्या संविधानाचा अभिमान, शेजारच्या देशात काय होतंय पाहा, सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान नेमकं काय म्हटलं?
आम्हाला आपल्या संविधानाचा अभिमान, शेजारच्या देशात काय होतंय पाहा : सुप्रीम कोर्ट
Chandrashekhar Bawankule : ओबीसींवर अन्याय होणार नाही, खोट्या नोंदी नकोच; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
ओबीसींवर अन्याय होणार नाही, खोट्या नोंदी नकोच; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
हायवाच्या धडकेत बुलेटस्वार सरपंच ठार, दवाखान्यात घेऊन गेलेल्या चिमुकल्या नातीचाही मृत्यू; आजी गंभीर जखमी
हायवाच्या धडकेत बुलेटस्वार सरपंच ठार, दवाखान्यात घेऊन गेलेल्या चिमुकल्या नातीचाही मृत्यू; आजी गंभीर जखमी
पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला हायकोर्टाकडून जामीन; 12 वर्षानंतर तुरुंगाबाहेर येणार फारुख बागवान
पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला हायकोर्टाकडून जामीन; 12 वर्षानंतर तुरुंगाबाहेर येणार फारुख बागवान
10 दिवसांपूर्वीच वास्तुशांती, नवं अलिशान घरं ठरलं कारण? नर्तिका-उपसरपंच प्रेमप्रकरणाची 'डिमांड स्टोरी'
10 दिवसांपूर्वीच वास्तुशांती, नवं अलिशान घरं ठरलं कारण? नर्तिका-उपसरपंच प्रेमप्रकरणाची 'डिमांड स्टोरी'
Mutual Fund : इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ऑगस्ट महिन्यात घटली, आकडेवारी समोर, गुंतवणूक तब्बल 22 टक्क्यांनी घसरली
इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत घसरण, ऑगस्ट महिन्यात गुंतवणूक 22 टक्क्यांनी घटली
Embed widget