(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 18th March 2023 : आज धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य
Horoscope Today 18th March 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 18th March 2023 : शनिवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. कर्क, धनु राशीच्या लोकांनी आज काळजी घ्यावी. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहिल. तर, काही राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. मेष ते मीन राशीसाठी शनिवार कसा राहिल, काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवावा. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यात गोडवा ठेवा. तुमच्यावर कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल पण आत्मविश्वासाने तुम्ही ती जबाबदारी पूर्ण करा. व्यवसायात वाढ होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांचीही मदत घेऊ शकता. घरात पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. घरी पूजा आणि पाठ होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतात. चांगल्या डॉक्टरांचाही सल्ला घ्या. तुम्ही तुमच्या मित्रासोबत काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, जिथे तुम्ही थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. गुंतवणूक करणारे लोक कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या मित्राचा सल्ला घ्या. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. स्पर्धेतही भाग घेतील, ज्यामध्ये ते जिंकतील. पालकांना मुलांकडून आदर मिळेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घेतल्यास चांगले होईल. तुम्ही तुमच्या प्रियकराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करुन देऊ शकता, जेणेकरुन तुमच्या लग्नात आणखी विलंब होणार नाही. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र धार्मिक स्थळी जाण्याचा बेत आखतील. आज तुमचा खर्च जास्त असू शकतो. तुम्ही तुमच्या वाहनावरही खर्च कराल. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. जे तरुण घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना उद्या त्यांच्या कुटुंबाची आठवण येऊ शकते. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना उद्या चांगला नफा मिळेल. तुम्ही जे नवीन काम करण्याचा प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यशही मिळेल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना उत्पन्नात वाढ झाल्याने खूप आनंद होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. भौतिक सुखात वाढ होईल. तुमचा आनंदीपणा तुमचा आत्मविश्वास वाढवेल. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, तिथे वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याचीही काळजी घ्या. बाहेरचं खाणे पिणे टाळा. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळू शकतात. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरु करु शकतात. व्यवसायाशी संबंधित प्रवासाची शक्यता आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहिल. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असू शकते. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील ज्यामध्ये त्यांना यश देखील मिळेल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात यश मिळाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक खूप आनंदी दिसतील. मित्रांकडूनही लाभ मिळेल. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा. तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. मुलांच्या शिक्षणावर जास्त खर्च होईल. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्यांना सन्मान मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. तुम्ही खूप दिवसांपासून काही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता, ते आज पूर्ण होईल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीत बढतीची बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होण्याची शक्यता आहे, प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, प्रवासातून नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवा, पण बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरीत यशाचा आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. शिक्षणात यश मिळेल. काही समस्येमुळे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो, ज्यामुळे घरातील सदस्यही उदास दिसतील. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना करु शकता. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. अशा वेळी संयम राखा. जे विद्यार्थी परदेशातून शिक्षण घेण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करत होते त्यांना यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नोकरदार लोकांनाही नोकरीच्या बाबतीत चांगली बातमी ऐकायला मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. जोडीदाराच्या तब्येतीबद्दल थोडी चिंता जाणवेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमची प्रगती पाहून काही लोक तुमच्यावर नाराज दिसतील. घरातील ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करुन आशीर्वाद घेतल्यास सर्व कामे पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. राजकारणात यश मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरदार वर्गाला नोकरीमध्ये बढतीच्या संधी मिळतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मानसिक शांतता लाभेल. व्यवसायातील कोणत्याही निर्णयाबाबत संभ्रमात राहू नका. यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांशी संवाद साधा. तसेच छोट्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात भरपूर नफा मिळेल. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. मुलांच्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर खूप आनंद होईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळू शकतो. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात नवीन कामे सुरु करण्याची चांगली संधी आहे. नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते, परंतु जुन्या नोकरीला चिकटून राहणे तुमच्यासाठी चांगले राहील. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्याबाबत तुम्हाला थोडी चिंता जाणवेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. तुमच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जे समाजाच्या सेवेसाठी काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. विद्यार्थी परीक्षेची तयारी मनापासून करतील यामध्ये त्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक आपली रखडलेली योजना पुन्हा सुरु करु शकता. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. मुलाच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडी चिंता जाणवेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर, प्लॉट खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज नवीन पाहुण्यांचं घरी आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, या वेळेत तुमच्या आवडीची कामे करा. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. राजकारणात यश मिळेल. रोजच्या दिनचर्येत योगासने आणि मॉर्निंग वॉकचा समावेश केल्यास तुमचे आरोग्य चांगले होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :