(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 16 February 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशींवर आज सरस्वतीची कृपा! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 16 February 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? मेष, वृषभ, मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 16 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 16 फेब्रुवारी 2024, शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
मेष (Aries Horoscope Mesh Rashi Today)
तुमचा आजचा दिवस साधारण असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असेल, आज तुम्हाला कामाचा जास्त ताण जाणवणार नाही. व्यावसायिकांनी आज कोणाकडून उसने पैसे घेऊन व्यवसाय चालवू नये, त्यापेक्षा काही काळ प्रतीक्षा करावी आणि त्यानंतर आपला व्यवसाय सुरू करावा. तरुणांनी आज अहंकार बाळगू नये, सर्वांशी आपुलकीने वागावे. आज तुम्ही तुमच्या खर्चांवर नियंत्रणा ठेवावं, अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर, आज तुम्ही डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी, डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते.
वृषभ (Taurus Horoscope Vrushabh Rashi Today)
तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या बॉसच्या मदतीने एखादं कठीण काम पूर्णत्वास नेऊ शकता. व्यावसायिकांनी व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी, कायदेशीर कारवाई टाळायची असल्यास सर्व कागदपत्र तयार ठेवा, जेणेकरुन तुमच्या प्रतिमेला कधी धक्का बसणार नाही. तरुणांचा आजचा दिवस चांगला जाईल, त्यांच्या इच्छा आज पूर्ण होतील. आज तुम्ही कोणत्याही वादात पडू नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. ताप, सर्दी, खोकल्यासारखे आजार तुम्हाला होऊ शकतात.
मिथुन (Gemini Horoscope Mitun Rashi Today)
तुमचा आजचा दिवस उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांना आज कामात यश मिळेल, यामुळे तुमचं मन खूप शांत राहील. कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील व्यावसायिकांनी आपली कागदपत्रं पूर्ण ठेवावीत, सरकारी परवानगीसारख्या प्रकरणांमुळे तुम्हाला रखडावं लागू शकतं. आज तुमच्या घरात छोटे-मोठे वाद होऊ शकतात, अशा वेळी तुम्ही हे वाद शांत करण्याचा प्रयत्न कराल तर चांगलं राहील. आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही आहारात दूध, कडधान्यांचा वापर करावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Bhishmashtami 2024 : भीष्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि पौराणिक कथा