एक्स्प्लोर

Horoscope Today 15 March 2024 : सिंह राशीच्या लोकांनी आज वाद टाळा; कर्क आणि कन्या राशीला गुंतवणुकीतून मिळणार फायदा, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 15 March 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

Horoscope Today 15 March 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 15 मार्च 2024 हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

कर्क (Cancer Horoscope Today) 

आज नोकरी-व्यवसायासाठी वातावरण अनुकूल राहील. आयुष्यात अनेक रोमांचक बदल घडतील. ऑफिसमध्ये अनावश्यक वाद टाळा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, यामुळे सर्व कामात अपेक्षित यश प्राप्त होईल. काही लोक आज नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकतात, परंतु थोडा वेळ प्रतीक्षा करणं चांगलं राहील. आज कुटुंबीयांच्या पाठिंब्याने आर्थिक लाभाचे नवीन मार्ग मोकळे होतील. आज आरोग्याची काळजी घ्या. काळजीपूर्वक वाहन चालवा आणि रहदारीचे नियम पाळा.

सिंह (Leo Horoscope Today) 

सिंह राशीसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. आज तुमच्या जीवनात अनेक मोठे बदल घडतील, पण यासोबतच तुमच्या जीवनातील अडचणी देखील वाढतील. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. आज जोडीदारासोबत नीट वागा, नात्यात गैरसमज वाढू देऊ नका. जोडीदाराची काळजी घ्या. आज तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, सकस आहार घ्या. निरोगी जीवनशैलीसाठी दररोज योगा आणि ध्यान करा. तसेच पैशाशी संबंधित निर्णय घेताना सावधगिरी बाळगा.

कन्या (Virgo Horoscope Today) 

आज कन्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल. जवळच्या मित्राच्या मदतीने जीवनात चाललेल्या समस्या सोडवल्या जातील. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं सुरू होतील. ऑफिसची कामं पूर्ण करण्यासाठी नवीन धोरण तयार करा. कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्याने देखील कामातील अडथळे दूर होतील. तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळेल. स्वत:च्या आणि घरातील मंडळींच्या आरोग्याकडे लक्ष द्या. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका, आर्थिक नुकसान होण्याची चिन्हं आहेत.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : तब्बल 12 वर्षांनंतर मेष राशीत बुध-गुरुची युती; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, प्रगतीसह धनलाभाचे संकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ 
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ 
काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा आज थेट मातोश्रीवर, संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा आज थेट मातोश्रीवर, संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर शरद पवार यांची प्रतिक्रियाSolapur PM Modi Sabha : सोलापूरमध्ये आज पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंची प्रचार सभा #abpमाझाEknath Shinde On Uddhav Thackeray : मला जेलची धमकी देऊ नका, मी चळवळीतून आलोय- शिंदेRajendra Mulak:राजेंद्र मुळकांवर कारवाई केवळ दिखावा?मुळकांवर कारवाई होऊनही काँग्रेस नेते व्यासपीठावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ 
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ 
काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा आज थेट मातोश्रीवर, संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा आज थेट मातोश्रीवर, संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
Raosaheb Danve : दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Embed widget