(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 14 August 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मार्गातील अडथळे होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 14 August 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 14 August 2024 : पंचांगानुसार, आज 14 ऑगस्ट 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल.तसेच ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज हितचिंतकांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे तुम्हाला उत्साह येईल. घरातील समारंभाच्या निमित्ताने आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आपले प्रकृतिमान सांभाळून आणि ओळखून त्याप्रमाणे पथ्य पाणी सांभाळावे. महिलांना मनाप्रमाणे कामे करून घेण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आज एखाद्या वेळी तुमच्या स्वभावातील अवखळपणा जवळच्या लोकांना फारच खटकेल. महिला घरामध्ये माझे तेच खरे हा पवित्रा घेतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज तुमच्या सहवासात येणाऱ्या लोकांना तुमच्यातील प्रेमाचा ओलावा कळेल. महिला स्वतःच्या धुंदीत राहतील. तुम्ही तुमच्या कामात मग्न असाल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
नोकरीमध्ये वरिष्ठांची हांजी हंजी न करता पटलं तर हो म्हण नाहीतर हा माझा राजीनामा या अविर्भावात वागणूक ठेवाल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
नोकरी बदलण्याचा संधी चालून येतील. व्यवसाय नोकरीत आजूबाजूचे वातावरण तुम्हाला हवे तसे मिळेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
उत्साहाने आनंदी वातावरणात कामाचा आनंदही घ्याल. आर्थिक बाजू भक्कम होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
खूप दिवस अडकून पडलेले पैसे हातात खुळखुळतील. महिलांनी मानसिक ताण जास्त घेऊ नये.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आपल्या हक्काच्या वस्तूंबाबत तुमचे विचार स्वच्छ आणि स्पष्ट राहतील. त्यामुळे संयमी राहा.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
नोकरी व्यवसायात सरकारी अडलेली कामे पार पडतील. महत्त्वाच्या कागदपत्रांवर शिक्कामोर्तब करून घ्यावे.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
योग्य वेळी समय सुचकता दाखवाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे वरिष्ठांची मने जिंकून घ्याल
मीन रास (Pisces Horoscope Today)
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं तुमच्याच हिताचं ठरेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: