Horoscope Today 12 May 2024 : मेष, मिथुनसह 'या' राशींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक, तर 'या' राशींचे सोन्याचे दिवस सुरु होणार; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 12 May 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्यजाणून घ्या.
Horoscope Today 12 May 2024 : पंचांगानुसार, आज 12 मे 2024, आजचा वार रविवार.आजचा दिवस खंडेरायाला समर्पित आहे. त्यामुळे काही राशींना आज चांगले तर काही राशींना वाईट परिणाम मिळतील.आजच्या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर पोट बिघडण्याची शक्यता आहे. मुलांवर भावनेच्या भरात अतिप्रेमाचा वर्षाव केला तर ती डोक्यावर बसतील.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
जुन्या पारंपरिक विचारांचा पगडा अचानक बुद्धीवर पडून त्याप्रमाणे आचरण कराल. त्यामुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आर्थिक बाबतीत थोड्या अडचणी निर्माण होतील. एका विशिष्ट मर्यादेनंतर मात्र धीर सुटण्याची शक्यता आहे परंतु लवकरच परिस्थिती सुधारेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज धार्मिक गोष्टींकडे कल जास्त वाढेल दुसऱ्याला मदत करण्यात अग्रेसर राहाल. रुढीप्रिया व्यक्तींच्या सहवासात आल्यामुळे तुमच्यावर त्यांचा पगडा राहील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
राजकारणात असणाऱ्या व्यक्तींना हव्या त्या माणसांच्या गाठीभेटी पडतील. सामाजिक क्षेत्रात मान मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
घरामध्ये तुम्ही घेतलेला निर्णय शिरोधार्य मानला जाईल. हाती घ्याल ते तडीस न्याल. महिला काटकसरी बनतील.
तुळ रास (Libra Horoscope Today)
डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर ठेवली तर संवाद साधण्यासाठी उपयोगी पडेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
जेवढे काम कराल त्या मानाने लाभ मात्र हवा तेवढा मिळणार नाही. ज्यांना त्वचारोगाचे विकार आहेत त्यांनी डॉक्टरी सल्ला घ्यावा.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आज पथ्य पाणी व्यवस्थित सांभाळावे. महिलांना स्वाभिमान थोडा बाजूला ठेवावा लागेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
जोडीदाराबाबत नसत्या चिंता कराल. धंद्यामध्ये पार्टनरच्या बाबतीत गैरसमज होण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
नोकरी धंदा किंवा करिअर बाबत बरीच स्वप्न रंगवाल. महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
मीन रास (Pisces Horoscope Today)
चिंता करण्याजोगी गोष्ट नसेल अशाही गोष्टीची चिंता कराल आणि मन स्वास्थ्य हरवून बसाल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: