Horoscope Today 05 October 2024 : आज नवरात्रीची तिसरी माळ, सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा जाईल? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 05 October 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 05 October 2024 : शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. आज नवरात्रीची तिसरी माळ आहे. आजच्या दिवशी देवी चंद्रघंटाच्या रुपाची पूजा केली जाते.हा दिवस अनेक राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. तसेच, आजच्या दिवसाचे काही राशींना चांगले तर काही राशींना वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
नोकरी (Job) - ऑगस्ट महिन्यातला पहिल्याच सोमवारच्या दिवशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी फार मेहनत घ्यावी लागेल. तरच, तुम्हाला यश मिळू शकतं.
व्यापार (Business) - तुमचा व्यवसाय सामान्य चालेल फक्त तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल.
तरूण (Youth) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी जास्त फोकस करण्याची गरज आहे.
आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शारीरिक कष्ट करावं लागणार नाही.
वृषभ रास (Taurus Today Horoscope)
नोकरी (Job) - तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मागील कामांची यादी ठेवावी, कारण तुम्हाला त्याबाबत विचारलं जाऊ शकतं. तुम्ही तुमची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. आज तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल.
विद्यार्थी (Student) - एखाद्या मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण तुम्हाला मिळू शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास होणार नाही. डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात.
मिथुन रास (Gemini Today Horoscope)
नोकरी (Job) - कामातील यश पाहून तुमच्या मनात अहंकार निर्माण होऊ शकतो, म्हणून तुम्ही तुमचा अहंकार सोडून कामात आणखी यशस्वी कामगिरी करण्याचा प्रयत्न करा.
व्यवसाय (Business) - किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो.
विद्यार्थी (Student) - तरुणांनी आज गरजूंच्या मदतीसाठी पुढे आलं पाहिजे, तुम्हाला त्यांचे खूप आशीर्वाद लाभतील. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल.
आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य उत्तम राहील.
कर्क रास (Cancer Today Horoscope)
नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी मरगळ किंवा कंटाळा आणून चालणार नाही. कामात उत्साह आणि एकाग्रता ठेवा. तरच तुम्हाला नोकरीत यशाची संधी मिळेल.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी कामाच्या ठिकाणी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. पैशांचा व्यवहार करताना फायदे-तोटेही लक्षात ठेवा. जेणेकरून भविष्यात तुम्हाला या गोष्टीची कल्पना असणं आवश्यक आहे.
तरूण (Youth) - युवकांंच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, खचून जाऊ नका. आव्हानांना सामोरं जा. देव तुमची परीक्षा पाहतोय. या परीक्षेला धैर्याने सामोरं जा. यश तुमचंच आहे.
आरोग्य (Health) - तुम्हाला किडनीच्या संबंधित त्रास होऊ शकतो. अशा वेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.
सिंह रास (Leo Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मनासारखं काम झाल्यामुळे उत्साह जाणवेल.
व्यवसाय (Business) - तुमच्या कामात प्रगती तर आहे. पण, तुम्ही अजूनही समाधानी नाही आहात. तुम्हाला अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायाशी संबंधित तुम्हाला प्रवास देखील करावा लागू शकतो.
तरूण (Youth) - जे तरूण सैन्यात भरती होऊ इच्छितात त्यांना शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घेणं गरजेचंच आहे.
आरोग्य (Health) - जर तुमच्या एखाद्या आजारासंदर्भात गोळ्या सुरु असतील तर त्या वेळेत घेण्याचा प्रयत्न करा. अन्यथा, तुमच्या तब्येतीवर येऊ शकतं.
कन्या रास (Virgo Today Horoscope)
नोकरी (Job) - एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना सहकाऱ्यांच्या गैरहजेरी, कामात लक्ष न देणं, योग्य पाठिंबा न मिळाल्याने मन नाराज होऊ शकतं. मनाची समजूत घाला.
व्यवसाय (Busiess) - व्यावसायिकांसाठी आजचा दिवस तसा पाहता चांगला आहे. पण कोणतीही डील फिक्स झाल्याशिवाय निर्णय घेऊ नका.
विद्यार्थी (Student) - तरूणांसाठी परदेशी जाण्याची उत्त्म संधी आहे. अनेक दिवसांपासून पाहात आलेलं स्वप्न लवकरच साकार होण्याची चिन्हं आहेत.
आरोग्य (Health) - ज्या लोकांची नुकतीच सर्जरी झाली आहे. अशा व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत अधिक निष्काळजीपणा करू नये.
तूळ रास (Libra Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कोणत्याच प्रकारचा ताण किंवा थकवा जाणवू देऊ नका. तुमची दिवसभरातील सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
आरोग्य (Health) - आज तुमचा ब्लड शुगर वाढण्याची शक्यता आहे. यासाठी थोडं वर्कआऊट, योगा, मेडिटेशन करायला सुरुवात करा.
व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गातील लोकांना आज चांगला नफा मिळू शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
युवक (Youth) - जोडीदाराबरोबरचा तुमचा आजचा दिवस मस्त, मजेत आणि आनंदात जाणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमची कामं वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्हाला भरपूर वेळ लागू शकतो.
आरोग्य (Health) - तुमच्या वाढत्या वजनाला पाहून तुम्हाला सतत चिंता जाणवू शकते. यामुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता.
व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायाची प्रगती काहीशी हळू असेल. पण यामुळे तुम्ही खचून जाऊ शकता. पण, मनात नकारात्मक भावना आणू नका.
कुटुंब (Family) - आज तुमच्या कुटुंबियांचा कल धार्मिकतेकडे वळेल. प्रवासाच्या यात्रेला देखील जाण्याची शक्यता आहे.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी गरजेपेक्षा जास्त मदत घ्याल. त्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो.
आरोग्य (Health) - आज तुम्ही कोणत्याही प्रकारचं शारीरिक कष्ट देणारं काम करू नये. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
प्रेमसंबंध (Relationship) - आज तुमचं मन एखाद्याच्या आठवणीत रमू शकतं. तुम्हाला रडू देखील येऊ शकतं.
कुटुंब (Family) - आज संध्याकाळी तुमच्या घरात पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं. अनपेक्षित शुभवार्ता तुम्हाला मिळू शकते.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
नोकरी (Job) - आज ऑफिसचं काम करताना घाई करू नका, कारण घाईत केलेलं काम बिघडू शकतं आणि त्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्याशी भांडू शकतात.
व्यवसाय (Business) - आज व्यवसायासाठी तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
विद्यार्थी (Student) - आज तुम्ही कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नये, अन्यथा तो तुमचा विश्वासघातही करू शकतो.
आरोग्य (Health) - तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
नोकरी (Job) - आज टेक्नोलॉजीचा वापर करुन ऑफिसचं काम पूर्ण करा, असं केल्याने तुमच्या कामाचा दर्जा सुधारेल.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, जे त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल.
आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल.
मीन रास (Pisces Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील, आज तुमचं मन कामात गुंतलेलं असेल.
व्यवसाय (Business) - जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्ही आधी चर्चा करा आणि मगच नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवा.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं, आज तुम्ही तुमचा शाळेचा गृहपाठ पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून ओरडा पडेल.
आरोग्य (Health) - तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: