एक्स्प्लोर

Hanuman Jayanti 2024 : यंदा हनुमान जयंती नेमकी कधी? अचूक तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

Hanuman Jayanti 2024 Date : बजरंगबलीच्या भक्तीसाठी हनुमान जयंतीचा दिवस खूप खास असतो. हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी चैत्र पौर्णिमा कधी? जाणून घेऊया.

Hanuman Jayanti 2024 Date : दरवर्षी पवनपुत्र हनुमानजींची जयंती चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला. हनुमानजींच्या वाढदिवसाला जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणणं योग्य ठरेल, कारण बजरंगबली अमर आहेत. या जगात हयात नसलेल्या व्यक्तींसाठी जयंती शब्द वापरला जातो.

हनुमान हे असे देव आहेत, ज्यांचं खऱ्या मनाने स्मरण केलं तर भक्तांचं प्रत्येक संकट दूर होतं, म्हणून त्यांना संकट मोचन असं म्हणतात. आता हनुमान जयंती 2024 ची तारीख, वेळ, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घेऊया

हनुमान जयंती 2024 कधी?

यावर्षी हनुमान जयंती 23 एप्रिल 2024 रोजी आहे. जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचं महत्त्व अधिक वाढतं, कारण हे दोन्ही दिवस बजरंगबलीला समर्पित आहेत. या दिवशी हनुमानजींची विशेष पूजा केली जाते. या दिवशी हनुमानजींच्या मूर्तीला आकर्षक सजावट, सुंदरकांड पठण, भजन, व्रत, दान, पठण, कीर्तन केलं जातं.

हनुमान जयंती 2024 मुहूर्त

पंचांगानुसार, चैत्र पौर्णिमा तिथी 23 एप्रिल 2024 रोजी पहाटे 03.25 वाजता सुरू होईल आणि 24 एप्रिल 2024 रोजी पहाटे 05.18 वाजता समाप्त होईल. यामुळे 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. या काळात दिवसभर शुभ मुहूर्त असतील.

हनुमान पूजेची वेळ (सकाळी) – सकाळी 09.03 ते दुपारी 01.58
हनुमान पूजेची वेळ (रात्री) - रात्री 08.14 ते रात्री 09.35

हनुमान जयंतीच्या दिवशी शुभ योग

नक्षत्रांबद्दल बोलायचं तर, हनुमान जयंतीला 23 एप्रिल 2024 रोजी, चित्रा नक्षत्र रात्री 10.32 मिनिटांपर्यंत राहील. यानंतर लगेच स्वाती नक्षत्र सुरू होईल. हनुमान जयंतीच्या दिवशी चंद्र कन्या राशीत आणि सूर्य मेष राशीत असेल.

हनुमान जयंती पूजा पद्धत

हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं. बजरंगबलीसमोर उपवासाचा संकल्प करा. या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालणं शुभ असतं. हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलीला चोळा अर्पण करा. यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा. पूजेमध्ये बजरंगबलीचा आवडता प्रसाद गुळ आणि हरभरा यांचा समावेश असावा. हनुमानाला बुंदीचे लाडूही अर्पण करता येतात. यानंतर 7 वेळा हनुमान चालिसा पठण करा. या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं. आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे, अन्न आणि पैसे गरजूंना दान करा.

हेही वाचा:

Budh Margi 2024 : अवघ्या 8 दिवसांत बुध होणार मार्गी; हनुमान जयंतीनंतर 'या' 3 राशींचं भाग्य उजळणार, धनात होणार अपार वाढ

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Embed widget