Hanuman Hayanti 2024 : हनुमान जयंतीला करा 'हा' उपाय, बजरंगबलीशी संबंधित 4 गोष्टी घरी आणा; सुख-समृद्धीसह वास्तु आणि ग्रह दोष होतील दूर
Hanuman Hayanti 2024 : चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलियुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते. यामुळे भक्तांच्या जीवनातील सर्व संकटं दूर होतात, असं म्हणतात.
Hanuman Hayanti 2024 : हिंदू दिनदर्शिकेमध्ये चैत्र महिना हा दैव-देवतांना समर्पित आहे. नुकताच नवरात्री (Chaitra Navratri), राम नवमी (Ram Navami), एकादशीचा (Ekadashi) उत्सव साजरा करण्यात आला. आता हनुमान जयंती (Hanuman Jayanti)23 एप्रिलला साजरी केली जाणार आहे. चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलियुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरुपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकटं दूर होतात, असं म्हणतात. तसेच, या लोकांना देवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. पूजेबरोबरच हनुमानाशी संबंधित काही वास्तू आणली तर घरात सुख-समृद्धी वाढते आणि साधकाला अनेक फायदे होतात.यासाठी येत्या हनुमान जयंतीला कोणत्या वस्तू घरी आणाव्यात हे जाणून घ्या.
1. घरामध्ये शेंदूर लावा
हनुमान चालीसा लिहीणारे गोस्वामी तुलसीदास म्हणतात की,'लाल देह लाली लासे अरु धर लाल लंगूर.' यावरून असे दिसून येते की हनुमानजींना शेंदूर खूप आवडतो. जेव्हा हनुमानाची पूजा केली जाते तेव्हा विशेषतः शेंदूर अर्पण केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, हनुमान जयंतीच्या दिवशी घरात शेंदूर लावल्याने भक्ताचे भाग्य लाभते. शेंदूर अर्पण केल्याने भगवान हनुमानाचा विशेष आशीर्वाद मिळतो. यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला शेंदूर लावा.
2. भगवान हनुमानाच्या रूपात वानर आणा
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान हनुमानाचे वानराच्या रूपात वर्णन केलं आहे. देवाचे हे रूप शुभ असण्याचे प्रतीक मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी वानराच्या स्वरूपाचा फोटो किंवा मूर्ती घरी आणा.वानराच्या फोटोमध्ये एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा असते, ज्यामुळे घरातील त्रास दूर होतो. याशिवाय घरात शांततेचं वातावरण निर्माण होते.
3. भगवान हनुमानाच्या शस्त्राची पूजा करा
गदा ही नकारात्मक शक्तींचा नाश करणारी म्हणून ओळखली जाते, म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी गदा घरी आणावी. जर घरात कोणतीही वाईट शक्ती असेल आणि कोणत्याही प्रकारची भीती तुम्हाला जाणवत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी गदा आणावी आणि तिची पूजा केल्यानंतर ती पूर्व दिशेला ठेवावी.
4. कुऱ्हाडीची स्थापना करा
जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल आणि तुम्हाला तो दूर करायचा असेल किंवा तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असतील तर हनुमान जयंतीच्या दिवशी त्याचे निराकरण करता येते. यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी घरात कुऱ्हाड आणावी. जर त्याचा आकार लहान असेल आणि तो तांब्याचा असेल तर आणखी चांगले आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: