Guru Purnima 2025 : गुरु: साक्षात् परब्रह्म! गुरुपौर्णिमेच्या आपल्या गुरुंना द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
Guru Purnima 2025 : यंदा गुरुपौर्णिमा 10 जुलै 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने तुम्ही देखील तुमच्या गुरुंना काही शुभेच्छा संदेश पाठवू शकता तसेच दिवसाचा आनंद द्विगुणित करु शकता.

Guru Purnima 2025 : हिंदू धर्मानुसार, आषाढी एकादशीला फार महत्त्व देण्यात आलं आहे. या पौर्णिमेलाच 'गुरुपौर्णिमा' (Guru Purnima) असं म्हणतात. गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यानुसार, यंदा गुरुपौर्णिमा 10 जुलै 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने तुम्ही देखील तुमच्या गुरुंना काही शुभेच्छा संदेश पाठवू शकता तसेच दिवसाचा आनंद द्विगुणित करु शकता.
गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश (Guru Purnima Wishes In Marathi)
गुरु म्हणजे आहे काशी
साती तीर्थ तया पाशी
तुका म्हणा ऐंसे गुरु
चरण त्याचे हृदयी धरू
गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!
गुरुंच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक अंधार दूर होईल आणि तुमचं जीवन प्रकाशमान होईल.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु आपल्या जीवनातील पहिला शिक्षक असतो.
त्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाने आपलं जीवन अधिक सुंदर आणि कर्तव्यदक्ष बनवूया.
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
ना वयाचे बंधन,
ना नात्याचे जोड ज्याला आहे अगाध ज्ञान,
जो देई नि:स्वार्थ दान,
गुरु त्यासी मानावा,
देव तेथेची जाणावा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
ज्याच्यामुळे जीवनात अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश येतो, त्यांचं सदैव कृतज्ञतेने स्वागत करा.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुशिवाय ज्ञान नाही,
ज्ञानशिवाय आत्मा नाही,
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,
सगळी आहे गुरुची देन,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जन्मापासून मरणापर्यंत योग्य मार्गदर्शन देणारा गुरुच असतो.
त्यांच्या आशीर्वादाने आपला प्रत्येक पाऊल पुढे वाढू दे.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुविना मति नाही,
गुरु विना गती नाही,
गुरुविना आपले अस्तित्व नाही
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!
गुरु आपल्या जीवनाचा दिवा असतो,
जो प्रत्येक अंधारातून तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु,
गुरुदेवो महेश्वर…
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या गुरुची मूर्ती आपल्या मनात कायम असली की
आपला मार्ग कधीच चुकत नसतो
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा...!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्ग दाखवता तुम्ही
जेव्हा काय करावे काहीही समजत नाही
तेव्हा आठवता तुम्ही
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!
हे ही वाचा :




















