एक्स्प्लोर

Guru Margi 2025 : 4 फेब्रुवारीपासून उजळणार 3 राशींचं भाग्य; गुरू चालणार सरळ चाल, आर्थिक स्थिती गाठणार नवी उंची

Guru Margi 2025 : बृहस्पती 4 फेब्रुवारीला आपली चाल बदलून सरळ चालीत मार्गी होईल. यानंतरचा काळ 3 राशींसाठी भाग्याचा असेल, या काळात तुमच्या सुख-संपत्तीत देखील वाढ होईल.

Guru Margi 2025 : बृहस्पति दरवर्षी आपली राशी बदलतो. संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला 12 वर्षं लागतात. या व्यतिरिक्त बृहस्पति, म्हणजेच गुरू मधेमधे आपली चाल देखील बदलतो, ज्याचा परिणाम सर्व राशींवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो. वैदिक कॅलेंडरनुसार, गुरु सध्या वृषभ राशीमध्ये वक्री स्थितीत आहे. पण तो 4 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 03:09 वाजता वृषभ राशीत सरळ चालीत मार्गी होईल. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

कर्क रास (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी गुरुची सरळ चाल खूप फायदेशीर ठरू शकते. येत्या काळात कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित लाभ होणार आहेत. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. यासोबतच तुम्ही नोकरीतही यश मिळवू शकता. तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेले प्रयत्न आता यशस्वी होऊ शकतात. व्यवसायातही नफा होणार आहे, विशेषत: सट्टेबाजी आणि व्यापाराशी संबंधित व्यवसायात भरपूर नफा होऊ शकतो. भरीव रक्कम मिळवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. आर्थिक स्थिती मजबूत राहील. यामुळे तुमचं तुमच्या जोडीदारासोबतचं नातं गोड होणार आहे.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी गुरूच्या चालीतील बदल शुभ परिणाम देणारा ठरेल. करिअरबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येतील. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. आयुष्यातील प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. कुंडलीतील नशिबाच्या घरात बृहस्पति असल्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळू शकतं आणि मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळात तुमचं आरोग्यही चांगलं राहील.

धनु रास (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी गुरूची सरळ हालचाल फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांचं उत्पन्न अनपेक्षितरित्या वाढू शकतं. यासोबतच तुम्हाला कर्जाच्या माध्यमातून बरेच फायदे मिळू शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुमचं काम पाहून एखादा उच्च अधिकारी तुम्हाला मोठं पद देऊ शकतो. यासोबतच तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रातही लाभ मिळू शकतो. जीवनात आनंदात झपाट्याने वाढ होऊ शकते. यासोबतच लव्ह लाईफबाबत थोडं संवेदनशील असणं खूप गरजेचं आहे, अन्यथा समस्या वाढू शकतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Makar Sankranti 2025 : यंदाची मकर संक्रांत 3 राशींसाठी ठरणार खास; 14 जानेवारीपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026 : आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget