एक्स्प्लोर

आज महाराष्ट्र दिन, तर गुरु ग्रहाचं वृषभ राशीत परिवर्तन; मेष, कर्कसह 'या' राशींना मिळणार कर्माचं फळ, वाचा 12 राशींचं राशीभविष्य

Horoscope Today 1 May 2024 : आजचा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व 12 राशीच्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 1 May 2024 : पंचांगानुसार, आज 1 मे 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज गुरू आपल्या उच्च राशीत प्रवेश करेल, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल.

आज गुरु मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करत आहे. गुरुच्या राशी बदलाचा परिणाम वर्षभर व्यक्तीच्या जीवनावर राहील, यानुसार तुमच्यासाठी हे परिवर्तन किती शुभ ठरेल? तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

ठरवलेल्या कार्यात यश मिळेल. अधिकार प्राप्तीचे योग येतील. मान मरातब मिळेल. उत्कृष्ट धनलाभ होईल. भरभराटीचा काळ आहे, त्यामुळे समोर आलेली संधी सोडू नका. नवीन खरेदी कराल. कुटुंबात सौख्याचे वातावरण राहील. नोकरीत स्थैर्य आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. 

वृषभ (Taurus Horoscope Today)

नको तेथे खर्च कराल, त्यामुळे धनसंचायात कमतरता निर्माण होईल. नातेवाईकांशी भांडणं संभवतात, त्यामुळे कौटुंबिक त्रासाला सामोरे जावे लागेल. अनावश्यक काळजी कराल. प्रवास त्रासदायक होईल. घर किंवा नोकरी स्थलांतरात अडथळे निर्माण होऊ शकतात. मुलांची प्रगती होईल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. 

मिथुन (Gemini Horoscope Today)

मनाविरुद्ध खर्च करावा लागेल. दुःखदायक घटनांना सामोरे जावे लागेल. सर्व गोष्टींची अति काळजी केल्यामुळे चिंता सतावेल. स्थावर इस्टेटीबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात. कुटुंबापासून लांब राहावे लागेल, परंतु अर्थसहाय्य मिळेल. घर, जागा, जमीन घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. 

कर्क (Cancer Horoscope Today)

नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. व्यवसायात तेजी निर्माण होईल. उत्कृष्ट अर्थप्राप्तीमुळे समाधानाचा अनुभव घ्याल. कौटुंबिक सौख्य चांगले मिळेल. ज्यांना विवाह करायचा आहे त्यांचे विवाह ठरतील. संतान प्राप्तीचे योग येतील. मानसन्मान मिळेल. यशाची पायरी चढाल. स्वप्नांची पूर्तता होईल. ऑनलाईन ट्रेडिंगसाठी चांगला काळ आहे.

सिंह (Leo Horoscope Today)

व्यवसायात अडचणी येऊ शकतात. जवळच्या माणसांमध्ये गैरसमज होतील. यशासाठी फार कष्ट घ्यावे लागतील. कौटुंबिक भांडणांना तोंड द्यावे लागेल. प्रकृतीला जपा. अपेक्षा जास्त ठेवल्या तर अपेक्षा भंगाचे दुःख  सतावेल. कष्ट भरपूर कराल. आर्थिक मान वाढेल. 

कन्या (Virgo Horoscope Today)

सर्व दृष्टीने फलदायी वर्ष जाईल. भाग्यवंती बरोबरच सर्व कार्यात यश मिळेल. सुख, समाधान, शांतीचा अनुभव घ्याल. सामाजिक मान प्रतिष्ठा वाढेल. स्वकर्तुत्वामुळे कीर्ती मिळेल. अनेक लाभ होतील. नवीन घर होईल. अध्यात्मिक उन्नती होईल. हातून सत्कर्म घडतील. पुत्रप्राप्तीचे योग येऊ शकतात. तणावातून मुक्त व्हाल.

तूळ (Libra Horoscope Today)

डोके जागेवर ठेवून निर्णय घ्या. प्रॉपर्टी कमवाल. कोणतेही अतिधाडस करू नये. अध्यात्मिक उन्नती चांगली होईल. कायद्याचे पालन करण्याचा शहाणपणा आहे, नाहीतर पुढील त्रासांना सामोरे जावे लागेल. प्रकृती सांभाळा. अनावश्यक खर्च होईल, त्यामुळे खूप चिंतेत असाल. नियोजन असल्याशिवाय प्रवास करू नये. प्रवासात त्रास, दगदग होईल. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

वैवाहिक सौख्य मिळेल. कुटुंबातील चांगल्या घटनांमुळे आनंदी राहाल. तरुण वर्गाचे विवाह ठरतील. नवीन वाहन घेण्याचे योग आहेत. पुत्र लाभ होईल. सर्व कार्यामध्ये यश मिळेल. बौद्धिक गोष्टींचा आनंद घ्याल. प्रतिष्ठा वाढेल. उत्तम आर्थिक परिस्थिती लाभेल. भावंडांची प्रगती होईल. 

धनु (Sagittarius Horoscope Today)

गुप्त शत्रू डोके वर काढतील. नातेविकांशी वितुष्ट येऊ शकते. नोकरवर्गाला त्रास होईल, त्यामुळे चिंताग्रस्त व्हाल अनावश्यक खर्च आणि कौटुंबिक त्रासामुळे बेजार व्हाल. प्रकृती अस्वस्थ राहील. त्यामुळे पथ्य पाणी सांभाळा. कर्ज घ्याल. व्यवसायात  वृद्धी होईल. खेळते भांडवल हातात राहील.

मकर (Capricorn Horoscope Today)

भरभराटीचा काळ आहे. भाग्योदय होईल. राज दरबारी मानसन्मान, वरिष्ठांकडून प्रशंसा, मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. कुटुंबात मंगल कार्य ठरेल. संताना प्राप्तीचे योग येतील. अनेक दृष्टीने शुभ फळे मिळतील. अध्यात्मिक वृत्ती वाढेल. उपासनेत वाढ होईल. गुरुकृपा लाभेल.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

कुटुंबामध्ये बऱ्याचदा तडजोडीचे प्रसंग येऊ शकतात. अनावश्यक खर्च करावे लागतील. काहींना अपेक्षाभंगाचे दुःख पचवावे लागेल. क्लेश कारक घटनांमुळे असमाधान निर्माण होईल. आर्थिक उलाढाल, नोकरी-व्यवसायात यश, कर्ज उपलब्ध होऊ शकतं. वारसा हक्काचे लाभ मिळतील.

मीन (Pisces Horoscope Today)

खर्चाचा ताळमेळ राहणार नाही. नातेवाईकांमुळे त्रास संभवतो. यशासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. प्रवासात अति कष्ट होतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मानहानीचे प्रसंग उद्भवू शकतात परंतु भाग्यवृद्धी होईल. ईश्वरी कृपा मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. विवाह ठरतील.        

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117

हेही वाचा:

Maharashtra Day 2024 Wishes : महाराष्ट्र दिनाच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; मायभूमीला करा वंदन, पाठवा 'हे' मेसेज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget