होळीपूर्वी मीन राशीत मोठी खळबळ, जुळून येतोय त्रिग्रही योग; चार राशींनी राहावे सावध, वाद टाळा, पैसे उसने देऊ नका!
Grah Gochar: होळीच्या अगोदर मार्चमध्ये त्रिग्रही योग (Trigraha Yog) जुळून आलाय. मीन राशीत मोठी खळबळ उडणार आहे. कारण सूर्य, बुध आणि राहू या तिन ग्रहांच्या एकत्रीत येण्याने त्रिग्रही योग तयार झाला आहे.
Grah Gochar: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर बारीक नजर असते. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करताच राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. मार्च महिना ग्रह- नक्षत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. ग्रहांच्या संक्रमणादरम्यान, जेव्हा दोन किंवा अधिक ग्रह एकाच राशीमध्ये एकत्र येतात तेव्हा त्याला ग्रह संयोग म्हणतात. ग्रहांच्या संयोगाचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. होळीच्या अगोदर मार्चमध्ये त्रिग्रही योग (Trigraha Yog) जुळून आलाय. मीन राशीत मोठी खळबळ उडणार आहे. कारण सूर्य, बुध आणि राहू या तिन ग्रहांच्या एकत्रीत येण्याने त्रिग्रही योग तयार झाला आहे. हा फार दुर्लभ योग असतो. हा योग काही राशींसाठी खूप अशुभ असणार आहे. या काळात चार राशीच्या काही लोकांनी सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे.
होळीपूर्वी मीन राशीत मोठी खळबळ उडणार आहे. या दिवशी मीन राशीमध्ये सूर्य, बुध आणि राहूचा संयोग आहे. 14 मार्चला सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. तर राहू ग्रह 30 ऑक्टोबर 2023 पासून मीन राशीत आहे. बुध 7 मार्चपासून मीन राशीत आहे आणि 26 मार्चपर्यंत या राशीत राहील. या ग्रहांच्या हालचालींचा चार राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे चार राशीच्या लोकांनी सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत.
या राशींवर होणार परिणाम
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांना या काळात अभ्यासात आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्हाला कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. तुमचा स्वभाव लोकांना आवडणार नाही.
सिंह (Leo)
सिंह राशीच्या लोकांना या काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोणतेही नवीन काम सुरू केले तर त्यात अडथळे येऊ शकतात. तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल.
कन्या (Virgo)
कन्या राशीच्या लोकांना या काळात काही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या लाजाळू स्वभावामुळे आलेल्य संधी गमवू शकता. त्यामुळे थोडे बोला
मीन (Pisces)
या काळात मीन राशीच्या स्वभावात बदल होऊ शकतो. या काळात मीन राशीच्या लोकांना त्यांचे जीवन योग्यरित्या संतुलित करण्यात अडचणी येऊ शकतात.त्यांना प्रेम संबंधांमध्ये समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला ब्रेकअपसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :