Garuda Purana Significance: मूर्ख मुलं, भांडण करणारी बायको हे पाच आहेत तुमच्या दुर्भाग्याचे संकेत, माहीत नसेल तर वाचा गरुड पुराणात काय सांगितले?
Garuda Purana Significance: जीवनाचे रहस्य गरुड पुराणात दडलेले आहे. झटपट यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि चांगले नशीब दोन्हीचे साथ असणे आवश्यक असते.
Garuda Purana Significance: गरुड पुराण (Garud Puran) हे हिंदू धर्माच्या सोळा पुराणांपैकी एक आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूंनी मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे. गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यांच्या वाहन गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचे संकलन आहे. . गरुड पुराणात धर्म, अध्यात्म, मोक्ष, जीवन मार्ग याबद्दल तपशीलवार चर्चा केली आहे. जीवनाचे रहस्य गरुड पुराणात दडलेले आहे. झटपट यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि चांगले नशीब दोन्हीचे साथ असणे आवश्यक असते. कधीकधी आपण खूप मेहनत करतो, पण आपल्याला मेहनतीचे फळ मिळत नाही, ज्यासाठी आपण खरोखरच पात्र आहोत. वारंवार प्रयत्न करुनही असे घडत असेल तर याचा अर्थ असा की तुमचे नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देत नाही.
गरुड पुराण कधी वाचले जाते?
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर गरुड पुराणाचे पठण केले जाते. शास्त्रानुसार गरुड पुराणाचा पाठ केल्याने आत्म्याला मुक्ती मिळते. वैष्णव संप्रदायाशी संबंधित गरुड पुराण मृत्यूनंतर मोक्ष प्राप्तीसाठी वाचले जाते. त्याची देवता स्वतः विष्णू मानली जाते, म्हणूनच हे वैष्णव पुराण आहे.
गरुड पुराणात मृत्यूनंतर मनुष्याचे काय होते याची माहिती देण्यात आली आहे. मृत्यूनंतर माणूस कोणत्या रुपात जन्म घेतो, भूत पिशासापासून मुक्ती कशी मिळवता येईल. श्राद्ध आणि पितृकर्म कसे करावे आणि नरकाच्या भयंकर वेदनांपासून मुक्ती कशी मिळवता येईल याविषयी त्यात सांगितले आहे. गरुड पुराणात जीवनातील अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या तुमचे दुर्भाग्य दर्शवतात. या गोष्टी भविष्यात नुकसान होण्याची शक्यता दर्शवतात.
गरुड पुराणात दुर्दैवाची कोणती लक्षणे सांगितली आहेत?
- गरुड पुराणानुसार जर एखादी व्यक्ती खूप श्रीमंत असेल पण त्याची मुले बुद्धिमान नसतील तर हे त्याचे दुर्दैव आहे.
- गरुड पुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीची पत्नी घरात विनाकारण भांडण करत राहिली तर समजावे की त्या व्यक्तीचे नशीब खराब आहे.
- गरुण पुराणात असे म्हटले आहे की, जर कुटुंबातील कोणताही सदस्य नेहमी आजारी असेल तर हे त्याच्यासाठी दुर्दैवीआहे.
- साफसफाई करूनही घरामध्ये घाण राहिली तर गरूड पुराणानुसार ते गरिबी येण्याचे लक्षण आहे.
- गरुड पुराणानुसार घर, कुटुंब आणि समाजात विनाकारण एखाद्या व्यक्तीचा वारंवार अपमान करावा लागत असेल तर ते दुर्भाग्याचे लक्षण आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Chanakya Niti : उपाशी राहिलात तरी चालेल पण बायकोला कधीच सांगू नका 'चार' गोष्टी; चाणक्य सांगतात, नाहीतर सुखी आयुष्याला लागेल नजर