Gemini Monthly Horoscope November 2023: नोव्हेंबरमध्ये मिथुन राशीच्या वैवाहिक जीवनात चढ-उतार; व्यवसायातही सावधतेची गरज, पाहा मासिक राशीभविष्य
Gemini Monthly Horoscope 2023: मिथुन राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर 2023 महिना कसा राहील? मिथुन राशीच्या नोव्हेंबरमधील व्यावसायिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक जीवनाबद्दल जाणून घेऊया.
Gemini Monthly Horoscope November 2023: मिथुन (Gemini) राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना (Monthly Horoscope) चांगला जाणार आहे. मात्र या महिन्यात आरोग्याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे. व्यावसायिक जगाशी संबंधित लोकांना फायदा होईल, तर विद्यार्थ्यांसाठीही हा महिना चांगला असेल. वैवाहिक जीवन चढ-उतारांनी भरलेलं असू शकतं.
मिथुन राशीच्या लोकांसाठी व्यवसायिक, शैक्षणिक आणि कौटुंबिकदृष्ट्या नोव्हेंबर महिना कसा असेल? हे सविस्तरपणे जाणून घेऊया.
मिथुन राशीचं नोव्हेंबरमधील व्यावसायिक जीवन
खाद्यपदार्थ, रेस्टॉरंट, वस्त्र, अॅनिमेशन, फॅशनशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांना या महिन्यात अधिक लाभ मिळू शकतो. छोट्या व्यवसायात थोडा फायदा होईल, पण तुम्हाला तोटा देखील सहन करावा लागू शकतो. या महिन्यात व्यवसायात तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकाल आणि तुमच्या क्षमतेचा आणि कौशल्याचा पुरेपूर वापर कराल. ऑफलाईन आणि ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून तुमच्या व्यवसायात आणखी सुधारणा होतील. सोशल मीडियावर मार्केटिंग केल्याने तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
मिथुन राशीच्या नोकरदारांचं नोव्हेंबरमधील जीवन
तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक जीवन वेगळं ठेवून हा महिना तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नोकरी मिळू शकते. हा महिना नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल असेल. कामात मेहनत करुन तुम्ही यशाचं शिखर गाठू शकता.
मिथुन राशीचं नोव्हेंबरमधील कौटुंबिक जीवन
नोव्हेंबर महिन्यात तुमचं कौटुंबिक जीवन चांगलं राहील आणि या महिन्यात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रेमीयुगुल जुनी नाराजी बाजूला ठेवून एकमेकांशी व्यवस्थित बोलतील. हा महिना वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून चढ-उतारांनी भरलेला असणार आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जोडीदाराची बाजू देखील ऐकून घ्यावी लागणार आहे.
मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांचं नोव्हेंबरमधील जीवन
विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि उच्चस्तरीय शिक्षण घेण्यात काही अडचणी येतील, परंतु तुमच्या मेहनतीला निश्चितच फळ मिळेल. तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अभ्यास करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेली मेहनत या महिन्यात योग्य दिशेने जाऊ शकते.
मिथुन राशीचं नोव्हेंबरमधील आरोग्य आणि प्रवास जीवन
नोव्हेंबर महिन्यात तुमचं आरोग्य चढ-उतारांनी भरलेलं असेल, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याचं गांभीर्याने पालन करा. या महिन्यात तुम्ही जिथे प्रवासाल जाल, तुमचा तो प्रवास फलदायी ठरू शकतो.
मिथुन राशीच्या लोकांसाठी उपाय
- 10 नोव्हेंबरला, म्हणजेच धनत्रयोदशीला पाच फळं आणा, त्यांना लाल चंदनाचा टिका द्या, काही नाण्यांसोबत नवीन लाल कपड्यात बांधा आणि तुमच्या घरात किंवा दुकानात खिळ्याला टांगून ठेवा.
- धनत्रयोदशीच्या दिवशी रत्न, जमीन, घर या गोष्टींची खरेदी करणं तुमच्यासाठी शुभ राहील. पण लाकडी वस्तू आणि अॅल्युमिनियमच्या वस्तू खरेदी करू नका.
- 12 नोव्हेंबरला, म्हणजेच महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी दीपावलीच्या रात्री लक्ष्मी-गणेशाची पूजा करताना, दक्षिणावर्ती शंखाची देखील पूजा करा आणि तुमच्या देव्हाऱ्यात ठेवा आणि दररोज त्याची पूजा करा. जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल, तर या उपायाने ती समस्या दूर होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope: दिवाळीनंतर ‘या’ राशींना अच्छे दिन; शनिच्या कृपेने होऊ शकतो प्रचंड धनलाभ