Gemini Horoscope Today 23 June 2023 : गुंतवणूक करताना घाईत निर्णय घेऊ नका; मिथुन राशीसाठी आजचा सल्ला
Gemini Horoscope Today 23 June 2023 : आज कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका, अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
Gemini Horoscope Today 23 June 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. कौटुंबिक (Family) जीवनात सुख-शांती राहील. आज कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका, अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमचे आरोग्य (Health) चांगले राहील. जोडीदाराचा (Life Partner) तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. तुमचे आरोग्य चांगले राहील. नवीन करार फायदेशीर वाटू शकतात, परंतु ते अपेक्षित लाभ देणार नाहीत. गुंतवणूक (Investment) करताना घाईघाईने निर्णय घेऊ नका. असे नवीन प्रकल्प सुरू करा जेणेकरून संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होईल. ज्यांना राजकारणात (Politics) करिअर करायचे आहे त्यांना आज चांगली संधी आहे. मोठ-मोठ्या सभांना संबोधित करण्याची तुम्हाला संधी मिळेल.
मिथुन राशीचे लोक आज व्यवसायात नवीन भागीदारी करू शकतात. तुमची कोणतीही जुनी योजना आज यशस्वी होईल. या योजनेतून तुम्हाला आर्थिक फायदा मिळेल. जे लोक आपले कार्यक्षेत्र बदलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आज त्यांच्या प्रयत्नात यश मिळेल. किराणा व्यावसायिक, इमारत बांधकामाशी संबंधित लोकांना आज त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल.
मिथुन राशीसाठी आजचे कौटुंबिक जीवन
मिथुन राशीच्या लोकांना आज कौटुंबिक जीवनात प्रेम आणि सहकार्य मिळेल. मुलांच्या शिक्षण आणि आरोग्याबाबत तुम्हाला चिंता वाटू शकते. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव आणि महत्त्व वाढेल. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा.
आज मिथुन राशीचे तुमचे आरोग्य
मिथुन राशीच्या लोकांना शरीराच्या मागील भागात त्रास होऊ शकतो. रक्तदाबाची काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका.
मिथुन राशीसाठी आजचे उपाय
नारायण कवच स्तोत्राचे पठण करा. आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :